IPO Update: पैशांना 'करंट' लागणार, महावितरण आयपीओ येणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 13:29 IST2026-02-26T13:26:23+5:302026-02-26T13:29:42+5:30
Mahavitaran IPO: कृषी विभाग वेगळा झाल्यानंतर कर्ज सुमारे २०,००० कोटींवर आणण्याचे उद्दिष्ट असून 'स्वच्छ' आर्थिक स्थिती दाखवून गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्याचा प्रयत्न केले जात आहेत.

राज्यातील सर्वांत मोठी वीज वितरण कंपनी महावितरण शेअर बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. २०२६ अखेरपर्यंत आयपीओ आणण्याचा विचार सुरू असून, त्याआधी कंपनीचा कृषी विभाग वेगळा करण्याची प्रक्रिया राबवली जाईल.

काय आहे योजना? : आधी डिमर्जर, मग आयपीओ कृषी ग्राहकांचा वीजपुरवठा आणि त्यावरील अनुदान वेगळ्या कंपनीकडे वर्ग करण्याची योजना एप्रिल २०२६ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य महावितरणच्या ताळेबंदावरील मोठा आर्थिक बोजा कमी होणार आहे.

१० टक्के हिस्सेदारी विक्रीची शक्यता: आयपीओद्वारे सुमारे १०% हिस्सा विक्री मिळणारा निधी पारेषण, वितरण यंत्रणा मजबूत करण्यासाठी आणि नवीकरणीय ऊर्जेसाठी वापरण्याचा मानस आहे.

महावितरणची ताकद किती? : राज्यभरातील सुमारे २.५ कोटींहून अधिक ग्राहक । देशातील सर्वात मोठ्या वीज वितरण कंपन्यांपैकी एक। ग्रामीण व शहरी दोन्ही भागांत विस्तृत जाळे । सौर व हरित ऊर्जेकडे वाढता कल आहे.

अजून काय स्पष्ट व्हायचे आहे? : सेबीकडे मसुदा प्रस्ताव कधी दाखल होणार ? प्राइस बँड, लॉट साईज, अचूक तारीख, कंपनीचे मूल्यांकन होणार आहे.

६६ हजार कोटींच्या बचतीची अपेक्षा: पुढील पाच वर्षांत ऊर्जा खरेदी खर्चात सुमारे ६६,००० कोटी रुपये बचत होण्याची अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे. यासाठी अक्षय ऊर्जेचा वाटा सध्याच्या सुमारे १५ टक्क्यांवरून ५२ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सौर, पवन आणि स्टोरेज यांचा वापर वाढविला जाणार आहे.

















