Business Ideas : कमी बजेटमध्ये घर बसल्या सुरू करा बिझनेस, तुमच्यासाठी काही सोप्या आयडियाज्

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 03:37 PM2021-03-18T15:37:52+5:302021-03-18T16:06:48+5:30

money making tips by own business know 5 small business plans start it just 10000 rupee : केंद्र सरकार तुमचे हे स्वप्न आता अत्मानिर्भर भारत या (Aatmanirbhar Bharat Mission) मिशनच्या माध्यमातून साकार होण्यास मदत करू शकते.

सध्या लोकांना नोकरी करुनही पैसा अपुरा पडतो. त्यामुळे लोक कोणत्या ना कोणत्या दुसऱ्या INCOME SOURCE कडे वळतात. मात्र, बहुतेकदा लोकांकडे एखादा BUSINESS सुरु करण्यासाठी पर्यायी भांडवल उपलब्ध नसते. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, आता केंद्र सरकार तुमचे हे स्वप्न आता अत्मानिर्भर भारत या (Aatmanirbhar Bharat Mission) मिशनच्या माध्यमातून साकार होण्यास मदत करू शकते.

या योजनेंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जात आहे. या माध्यमातून सरकार बंद व्यवसाय किंवा व्यवसायाचे पुनरुज्जीवन करण्याची संधी देत ​​आहे. पण यासाठी आधी कोणता व्यवसाय तुमच्यासाठी योग्य आहे याचा निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही घर बसल्या सुरू कमी किंमतीत सुरू करू शकता.

ब्रेड मेकिंग ची सुरुवात तुम्ही घरापासूनच करु शकता. तुम्ही ब्रेड बनवून ते बेकरी किंवा बाजारपेठेत सप्‍लाय करु शकता. हा सगळ्यात सोपा, कमी वेळेत आणि कमी गुंतवणुकीत होणारा व्यवसाय आहे.

लॉकडाऊननंतर ब्रेड खाणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. या व्यवसायाला सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त 10,000 रुपयांची गरज आहे. ब्रेड बनवण्यासाठी तुम्हाला लागणारे साहित्य – गव्हाचं पीठ किंवा मैदा, मीठ, साखर, पाणी, बेकिंग पावडर, ड्राय फूड आणि मिल्क पाउडर.

जर तुम्हाला लेखक व्हायचं असेल तर तुम्ही ब्लॉगिंगद्वारे पैसेही कमवू शकता. तुमच्याकडे लिहायचं कौशल्य असेल तर लॅपटॉपवर तुम्ही याची सुरुवात करू शकता. यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात ब्लॉगिंग सुरू केल्यास स्वतःची वेबसाइट देखील बनवू शकता. त्याच्या जाहिरातीसाठी बरेच चॅनेल उपलब्ध आहेत.

Youtube चॅनलच्या माध्यमातून मोठेच काय तर अगदी लहानलहान मुले सुद्धा कमवायला लागली आहेत. रेयान (Ryan Kaji) या ९ वर्षांच्या मुलाने या माध्यमातून कोट्यवधीं रुपयांची कमाई केली आहे. रेयान त्याचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करतो आणि कोट्यवधी रुपये कमावतो. तुम्हीही यूट्यूबवर व्हिडिओ तयार करून भरपूर पैसे कमवू शकता फक्त तुम्ही सर्जनशील असले पाहिजे.

अॅडव्हरटाइज़िंग कॅम्पेन डेवलपर हा पूर्णपणे ऑनलाइन व्यवसाय आहे. त्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि मग वेबसाइट तयार करुन तुमच्या कामाची सुरुवात करावी लागेल. गुगलवर याचे शिक्षण देणाऱ्या अनेक वेबसाईट्स सापडतील. हे अभ्यासक्रम २१ दिवसांपासून ३ महिन्यांपर्यंत असतात. त्यानंतर तुम्ही डिजिटल प्रमोशनशी कनेक्ट करु शकता. आपला व्यवसायाची सुरुवात करु शकता.

जर तुम्ही हुशार असाल तर तुम्ही ऑनलाईन (Start Your Online Classes) सुरू करू शकता. बँक, SSC ते सिव्हिल सर्व्हिसेसची तयारीही ऑनलाइन केली जात आहे. असे बरेच प्लॅटफॉर्म आहेत जे फक्त ऑनलाइन कोर्समधून कोटींची उलाढाल करत आहेत. हे सुरू करण्यासाठी जास्त खर्च होणार नाही.