Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स

By जयदीप दाभोळकर | Updated: September 9, 2025 09:39 IST2025-09-09T09:33:19+5:302025-09-09T09:39:30+5:30

Post Office MIS Scheme: गुंतवणूक ही आता काळाची गरज बनली आहे. जर तुम्ही योग्य ठिकाणी आणि योग्यरित्या अभ्यासपूर्वक गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.

Post Office MIS Scheme: गुंतवणूक ही आता काळाची गरज बनली आहे. जर तुम्ही योग्य ठिकाणी आणि योग्यरित्या अभ्यासपूर्वक गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. परंतु यासाठी गुंतवणुकीसोबतच संयम असणंही तितकंच आवश्यक आहे. सरकारही गुंतवणूकीला प्रोत्साहन देत असून त्यांनी अनेक नव्या योजना सुरू केल्या आहेत.

देशातील सामान्य नागरिकांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात ठेवून, पोस्ट ऑफिस विविध बचत योजना चालवते. पोस्ट ऑफिसमध्ये आपण पीपीएफ, केव्हीपी, टीडी, आरडीसह एमआयएस यासह अनेक प्रकारच्या खाती उघडू शकता. आज आम्ही आपल्याला पोस्ट ऑफिसच्या एमआयएसबद्दल म्हणजे मासिक उत्पन्न योजनेबद्दल माहिती देणार आहोत. पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूकदारांना पूर्णपणे गुंतवणूक करावी लागेल, ज्यावर आपल्याला दरमहा निश्चित व्याज मिळतं.

पोस्ट ऑफिस आयई पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेवर ग्राहकांना वार्षिक ७.४ टक्के व्याज देत आहे. पोस्ट ऑफिसच्या एमआयएस योजनेत कमीतकमी १००० रुपये जमा केले जाऊ शकतात. या योजनेंतर्गत जास्तीत जास्त ९ लाख रुपये एकाच खात्यात जमा केले जाऊ शकतात.

आपण संयुक्त खाते उघडल्यास आपण त्यात जास्तीत जास्त १५ लाख रुपये जमा करू शकता. जास्तीत जास्त ३ लोक संयुक्त खात्यात समाविष्ट केले जाऊ शकतात. पोस्ट ऑफिसमध्ये एसआयएस खातं उघडण्यासाठी आपल्याकडे पोस्ट ऑफिसचं स्वतःचं बचत खातं असणं आवश्यक आहे.

जर आपण पोस्ट ऑफिसच्या एमआयएस योजनेत ९ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर आपल्याला दरमहा ५५५० रुपयांचे निश्चित व्याज मिळेल. एमआयएस योजनेंतर्गत दरमहा प्राप्त व्याज पैसे थेट आपल्या पोस्ट ऑफिस सेव्हिंग खात्यात जमा केले जातात.

ही पोस्ट ऑफिस योजना ५ वर्षात मॅच्युअर होते. मॅच्युरिटीनंतर, आपण जमा केलेले सर्व पैसे आपल्या बचत खात्यात परत ट्रान्सफर केले जातात.