SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 13:53 IST2025-07-15T13:16:47+5:302025-07-15T13:53:15+5:30

Mutual Funds : सध्या भारतीय शेअर बाजारात सुरू असलेल्या चढ-उतारांमध्ये एक मोठी घडामोड समोर आली आहे. जून महिन्यात, देशातील ६ मोठ्या म्युच्युअल फंड कंपन्यांनी एकूण १३ स्मॉल कॅप (लहान) कंपन्यांमधून आपली संपूर्ण गुंतवणूक काढून घेतली आहे. याचा अर्थ, या कंपन्यांनी आपल्या पोर्टफोलिओमधून हे शेअर्स पूर्णपणे विकून टाकले आहेत.

या आघाडीच्या म्युच्युअल फंड कंपन्यांमध्ये HDFC म्युच्युअल फंड, SBI म्युच्युअल फंड, कोटक म्युच्युअल फंड, निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड, क्वांट म्युच्युअल फंड आणि ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड यांचा समावेश आहे. त्यांच्या पोर्टफोलिओ व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

HDFC म्युच्युअल फंड : जूनमध्ये एचडीएफसी म्युच्युअल फंडने सफारी इंडस्ट्रीज (Safari Industries) आणि व्हीएसटी इंडस्ट्रीज (VST Industries) या दोन स्मॉल कॅप स्टॉकमधून आपली संपूर्ण गुंतवणूक काढून घेतली.

SBI म्युच्युअल फंड : जून २०२५ मध्ये एसबीआय म्युच्युअल फंडने गुजरात स्टेट पेट्रोनेट आणि प्रिव्ही स्पेशालिटी (Privi Specialty) या दोन स्मॉल कॅप कंपन्यांमधून सर्व पैसे बाहेर काढले.

कोटक म्युच्युअल फंड : कोटक म्युच्युअल फंडने जूनमध्ये क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स या एका कंपनीतून आपले सर्व शेअर्स विकले.

निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड : या काळात निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडने एकूण तीन स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्स पूर्णपणे विकून टाकले. यात ओरिएंट सिमेंट, फ्यूजन मायक्रोफायनान्स आणि अतुल यांचा समावेश आहे.

क्वांट म्युच्युअल फंड : जून २०२५ मध्ये क्वांट म्युच्युअल फंडने दोन कंपन्यांमधून आपली संपूर्ण गुंतवणूक काढून घेतली. यात हुडको आणि पारस डिफेन्स (Paras Defense) यांचा समावेश आहे.

ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड : आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने जूनमध्ये तीन कंपन्यांमधून पूर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या कंपन्या आहेत रूट मोबाईल, त्रिवेणी टर्बाइन आणि इंटेलेक्ट डिझाइन.

सूचना : हा लेख केवळ माहितीसाठी आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी कृपया तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.