शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC चे विक्रमी हप्ते संकलन; तब्बल १.८४ लाख कोटी रुपये जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 3:59 PM

1 / 10
देशातील सर्वांत मोठी जीवन विमा कंपनी भारतीय आयुर्विमा मंडळ अर्थात LIC साठी गतवर्षातील कोरोना काळ संकट नव्हे तर संधी ठरल्याचे पाहायला मिळत आहे.
2 / 10
अर्थजगतासाठी आव्हानात्मक ठरलेल्या या काळात LIC ची व्यावसायिक कामगिरी मात्र चमकदार ठरली आहे. गेल्या आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये एलआयसीने नवीन हप्त्यांपोटी १.८४ लाख कोटी रुपये असे आजवरचे सर्वोच्च उत्पन्न कमावले आहे.
3 / 10
व्यक्तिगत विम्याच्या बाबतीत पहिल्या वर्षाच्या हप्त्यापोटी LIC उत्पन्न हे ५६,४०६ कोटी रुपये आहे, जे आधीच्या वर्षाच्या तुलनेत १०.११ टक्के वाढले आहे. (lic received highest new premium)
4 / 10
LIC ने गेल्या वर्षात २.१० कोटी पॉलिसींची विक्री केली, ज्यापैकी ४६.७२ लाख पॉलिसी या केवळ मार्च २०२१ मध्ये विकल्या गेल्या आहेत. आधीच्या वर्षाच्या तुलनेत २९८.८२ टक्के अशी वाढ राखणारे प्रमाण आहे.
5 / 10
मार्च २०२१ मध्ये विकल्या गेलेल्या आणि संपूर्ण वर्षात विकल्या गेलेल्या पॉलिसींमध्ये LIC चा बाजारहिस्सा हा अनुक्रमे ८१.०४ टक्के आणि ७४.५८ टक्के असा राहिला आहे.
6 / 10
तर, प्रथम वर्षाचा हप्त्यांच्या बाबतीत LIC चा बाजारहिस्सा हा मार्च महिन्यासाठी ६४.७४ टक्के आणि संपूर्ण वर्षासाठी ६६.१८ टक्के असा राहिला आहे.
7 / 10
कोरोनाच्या काळातील संचारबंदीचे निर्बंध असतानाही, दावे निवारणाच्या आघाडीवर LIC ने खूप चांगली कामगिरी केली. एकूण १.३४ लाख कोटी रुपयांचे विमेदारांचे दावे मंजूर केले गेले, जो नवीन उच्चांक आहे.
8 / 10
तसेच सुमारे २.१९ कोटी विमाधारकांचे मुदतपूर्ती दावे सरलेल्या वर्षभरात मंजूर करण्यात आले. ९.५९ लाख मृत्यू दावे मंजूर करून, १८,१३७.३४ कोटी रुपयांची भरपाई करण्यात आली.
9 / 10
दरम्यान, भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC च्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोनाच्या कठीण काळातही केंद्र सरकारने LIC कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे.
10 / 10
LIC कर्मचाऱ्यांना तब्बल २५ टक्के वेतनावाढ सरकारकडून मंजूर करण्यात आली आहे. तसेच कामकाजाचा ५ दिवसांचा आठवडा केंद्र सरकारने मान्य केला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास १ लाख ४० हजार कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.
टॅग्स :LIC - Life Insurance Corporationएलआयसीbusinessव्यवसाय