एका प्रीमिअमने होईल वृद्धापकाळातील व्यवस्था, LIC ने सादर केली विशेष पॉलिसी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 05:51 PM2022-09-06T17:51:26+5:302022-09-06T17:56:01+5:30

हा प्लॅन सिंगल प्रीमियम पेमेंट पॉलिसी किंवा नियमित प्रीमियम पेमेंट प्लॅनच्या रूपात खरेदी केली जाऊ शकतो.

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच LIC ने 5 सप्टेंबरपासून नवीन पेन्शन प्लस प्लॅन (New Pension Plus) सादर केला आहे. हा एक नॉन-पार्टिसिपेटेड, युनिट लिंक्ड, वैयक्तिक पेन्शन प्लॅन आहे. या प्लॅनद्वारे मोठ्या प्रमाणात कॉर्पस तयार करण्यास मदत होते. या फंडचा अवधी पूर्ण झाल्यानंतर अॅन्युइटी प्लॅन खरेदी करून या फंडाचे नियमित उत्पन्नात रूपांतर केले जाऊ शकते.

हा प्लॅन सिंगल प्रीमियम पेमेंट पॉलिसी किंवा नियमित प्रीमियम पेमेंट प्लॅनच्या रूपात खरेदी केली जाऊ शकतो. नियमित पेमेंटच्या पर्यायासह, पॉलिसीच्या संपूर्ण मुदतीदरम्यान प्रीमियम भरावा लागतो.

पॉलिसीधारकास देय प्रीमियमची रक्कम आणि पॉलिसीची मुदत, प्रीमियमची किमान आणि कमाल मर्यादा आणि वय निवडण्याचा पर्याय असेल. काही अटींच्या अधीन राहून मूळ पॉलिसी सारख्याच अटी व शर्तींसह जमा करण्याचा कालावधी कालावधी किंवा डिफरमेंट पिरिअड वाढवण्याचा पर्याय देखील त्याच पॉलिसीमध्ये उपलब्ध असेल.

पॉलिसीधारकाला उपलब्ध असलेल्या चार प्रकारच्या फंडांपैकी एकामध्ये प्रीमियम गुंतवण्याचा पर्याय मिळतो. पॉलिसीधारकाने भरलेल्या प्रत्येक हप्त्यावर प्रीमियम अलोकेशन शुल्क आकारले जाईल. उर्वरित रक्कम अलोकेशन रेटच्या रूपात मानली जाते. त्याचा उपयोग पॉलिसीधारकाने निवडलेल्या फंडाची युनिट्स खरेदी करण्यासाठी केला जातो. एका पॉलिसी इयरमध्ये फंड बदलण्यासाठी चार फ्री स्विचेस उपलब्ध आहेत.

गॅरंटीड अॅडिशन्स वार्षिक प्रीमियमच्या टक्केवारीच्या रूपात देय असतील. नियमित प्रीमियमवर 5-15.5 टक्क्यांदरम्यान आणि सिंगल प्रीमिअम दिल्यास एक पॉलिसी इयर पूर्ण झाल्यावर 5 टक्के देय असेल. निवडलेल्या फंड प्रकारावर आधारित युनिट्स खरेदी करण्यासाठी गॅरंटीड अॅडिशन्सचा वापर केला जाईल.

NAV ची गणना दररोज केली जाईल आणि प्रत्येक फंड प्रकारासाठी गुंतवणूक कामगिरी, निधी व्यवस्थापन शुल्क यावर आधारित असेल. ही पॉलिसी एजंट, इतर मध्यस्थांद्वारे तसेच LIC च्या वेबसाइटवरून ऑनलाइन खरेदी केली जाऊ शकते.