मस्तच! Vi ने युझर्ससाठी आणलेत १०० रुपयांपेक्षा कमी किमतीचे हटके प्लान्स; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 09:44 PM2021-03-16T21:44:26+5:302021-03-16T21:51:02+5:30

जिओ आणि एअरटेलशी तीव्र स्पर्धा असलेल्या Vi ने युझर्ससाठी १०० रुपयांमध्ये अनेक चांगले प्लान ऑफर केले आहेत. Prepaid Recharge Plans आणि Vi Combo आणि Validity Plans यांचा यामध्ये समावेश आहे. (vodafone idea vi prepaid recharge plan)

जिओ कंपनीच्या टेलिकॉम जगतातील एन्ट्रीनंतर सर्व परिमाण आणि परिणाम बदलून गेले आहेत. स्वस्तात चांगले प्लान देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये चढाओढ लागल्याची पाहायला मिळत आहे. यातूनच कंपन्या विविध हटके प्लान्स सादर करत आहेत. (vodafone idea vi prepaid recharge plan)

युझर्सना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या कमी किमतीचे प्लान्स आणत असून, यात वोडाफोन आयडिया (Vi) देखील मागे नाही. Vi कडूनही युझर्सना उत्तमोत्तम प्लान्स ऑफर केले जात आहेत.

जिओ आणि एअरटेलशी तीव्र स्पर्धा असलेल्या Vi कडून भारतात आपली स्थिती आणखी जास्त मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. Vi चे कोट्यवधी युझर्स भारतात आहेत. Vi ने १०० रुपयांपेक्षा कमी किमतीचे Prepaid Recharge Plans सादर केले आहेत.

Vi च्या या Prepaid Recharge Plans मध्ये युझर्सना Talktime Plans सोबत Data आणि Combo/validity चे प्लान्स ऑफर केले आहेत. कंपनीकडून नेमकं काय ऑफर केले जात आहे? पाहुया...

छोट्या शहरात आणि गावात फीचर फोनचा जास्त वापर केला जातो. त्यामुळे १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत प्रीपेड रिचार्ज प्लान्स अधिक उपयुक्त मानले जातात. या युझर्सना डोळ्यासमोर ठेवून Vi ने काही स्वस्तात मस्त प्लान्स आणले आहेत.

१०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनलिमिटेड प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये १९ रुपयांचा एक अनलिमिटेड प्लान आहे. ज्यात युजर्सला २ दिवसांसाठी अनलिमिटेड टॉकटाइमसोबत २०० एमबी डेटा मिळतो. तर, १० रुपयांच्या रिचार्जवर युजर्संना ७.४७ रुपये मिळतात.

Vi च्या २० रुपयांच्या रिचार्जवर १४.९५ रुपये टॉकटाइम मिळतो. ३० रुपयांच्या रिचार्जवर युजर्संना २२.४२ रुपये मिळतात. याचा वापर व्हाइस कॉलिंगमध्ये केला जाऊ शकतो. तसेच Vi चा २७ रुपयांचा आयएसडी प्लान आहे.

Vi चा एक प्लान ४६ रुपयांचा आहे. यात युजर्सला २८ दिवसांसाठी प्रत्येक रात्री सेम नेटवर्कवर १० मिनिट कॉल व्हाइस कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय, Vi चे १२ रुपये, २६ रुपये, ३६ रुपये असे तीन SMS प्लान्स आहेत.

Vi च्या ७९ रुपयांचा प्लानमध्ये युजर्संना २८ दिवसांची वैधता मिळते. तसेच ४०० एमबी डेटा आणि ६४ रुपयांचा टॉकटाइम मिळतो. ६३ रुपयांचा प्लान मध्ये २८ दिवासांची वैधता सोबत १०० एमबी डेटा आणि ५२ रुपयांचा टॉकटाइम मिळतो.

Vi च्या ५९ रुपयांच्या प्लानमध्ये ३० लोकल, नॅशनल आणि रोमिंग मिनिट्स सोबत २८ दिवसांची वैधता मिळते. ३० रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये १४ दिवसांची वैधता आणि १०० एमबी डेटा मिळतो. तर, १६ रुपयांच्या प्लानमध्ये १ दिवसाची वैधता व १ जीबी डेटा मिळतो.

Vi च्या ४८ रुपयांच्या रिजार्जवर २८ दिवसांची वैधता आणि ३ जीबी डेटा मिळतो. तसेच ९८ रुपयांच्या डेटा प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता आणि १२ जीबी डेटा ऑफर केला जातो. याशिवाय Vi Combo आणि Validity Plans युझर्सना ऑफर केले जात आहेत.

Vi च्या Combo आणि Validity Plans मध्ये ९५ रुपयांचा प्लान सेविंग प्लान आहे. यात ५६ दिवसांची वैधता, २०० एमबी डेटा आणि ७४ रुपयांचा टॉकटाइम मिळतो. कॉम्बो आणि व्हॅलिडिटी प्लानमध्ये आणखीन एक ४९ रुपयांचा प्लान असून, यात २८ दिवसांची वैधता, ३०० एमबी डेटा आणि ३८ रुपयांचा टॉकटाइम युझर्सना ऑफर केला जातो.