तुमचं रेशन कार्ड तर रद्द झालेलं नाही ना? 'असे' करा आधारशी लिंक आणि तपासून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 11:33 PM2021-03-18T23:33:34+5:302021-03-18T23:41:57+5:30

आपले रेशनकार्ड रद्द केले गेले आहे की, नाही हे आपण सहज पडताळू शकतो. रेशन कार्ड (Ration Card) आणि आधार कार्ड (Aadhar Card) लिंक करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या... (know about how to link ration card to aadhar card and check your name)

सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेतून देशातील विविध राज्यांमधील सुमारे तीन कोटी रेशन कार्ड (Ration Card) रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही रेशन कार्ड आधार कार्डाशी (Aadhar Card) लिंक न केल्यामुळे रद्दबातल ठरवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

गेल्या काही वर्षांत उपासमारीमुळे होणाऱ्या अनेक मृत्यूच्या बातम्या समोर आल्या असून, यामध्ये काही कारणास्तव रेशन कार्ड आधारशी जोडलेले नसल्याने त्यांना रेशन मिळाले नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. (how to link ration card to aadhar card)

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या विषयावर उत्तर देण्यासाठी समन्स बजावले आहे. देशातील काही राज्यांमध्ये रेशन न मिळाल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला उपाशी झोपण्यास भाग पाडले गेले, अशा तक्रारीही आल्या होत्या. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. (how to check your name in ration card)

आदिवासी भागात किंवा देशातील दुर्गम भागात इंटरनेट नसल्यामुळे रेशन कार्ड आधारशी जोडले जात नाहीत. यासह रेशनकार्ड रद्द केली जात आहेत, त्यामुळे सार्वजनिक वितरण प्रणालीत गरीब लोकांना रेशन मिळत नाही. ज्याचे रेशनकार्ड आधार कार्डशी जोडलेले नसेल त्याला रेशन दुकानदार रेशन देण्यास नकार देतात, असेही समोर आले आहे. (ration card and aadhar card)

आधार कार्डचा रेशन कार्डला जोडलेले नसल्यामुळे रेशनकार्ड रद्द केली जात आहेत, या याचिकेत केलेला आरोप निराधार असल्याचे केंद्रातील मोदी सरकारने स्पष्ट केले आहे. रेशन कार्ड आधारद्वारे पडताळले नाही, तर कोणाचे रेशन थांबवता येणार नाही, अशा स्पष्ट मार्गदर्शक सूचना आहेत.

रेशन कार्ड-आधार लिंकच्या आधारे गरिबांचे रेशन रोखले जाऊ शकत नाही, असे केंद्राच्या वतीने वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले आहेत की, कोणतेही रेशनकार्ड आधार क्रमांकाशी जोडलेले नसल्यामुळे कोटा नाकारला जाणार नाही. या आधारे केवळ कोणत्याही लाभार्थ्याचे नाव काढले जाऊ शकत नाही, तसेच रेशनकार्ड रद्द करता येणार नाहीत.

आपले रेशनकार्ड रद्द केले गेले आहे की, नाही हे आपण सहज पडताळू शकतो. यासाठी प्रथम पीडीएस विभागात जा आणि त्याविषयी माहिती घ्यावी. पीडीएस विभागाला आपले रेशन कार्ड आणि आधार कार्ड दाखवावे लागेल. जर दोन्ही कागदपत्रे जोडली गेली नाहीत तर ती तेथून देखील जोडली जातील.

या प्रक्रियेनंतर आपले नवीन रेशन कार्ड तयार केले जाईल. नवीन रेशन कार्ड तयार करण्यासाठी आपल्या घराशेजारील पीडीएस केंद्र किंवा रेशनिंग दुकानाला भेट द्यावी. आधार कार्डची एक प्रत आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांसह आपल्या रेशनकार्डची झेरॉक्स कॉपी घ्यावी.

कुटुंबाच्या प्रमुखाचा पासपोर्ट आकाराचा फोटो घ्यावा. तुमचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक नसेल, तर तुम्हाला बँकेच्या पासबुकचीही प्रत द्यावी लागेल. आपल्या आधारच्या प्रतिसह पीडीएस शॉपवर ही सर्व कागदपत्रे सादर करा.

रेशन दुकान चालवणारी व्यक्ती आधार सत्यापित करण्यासाठी बायोमेट्रिक डेटांतर्गत फिंगर प्रिंट मागवू शकते. सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक SMS पाठविला जाईल.

आधार आणि रेशन कार्ड लिंक केले जातात, तेव्हा त्याचा संदेश मोबाईल नंबरवर येईल. दरम्यान, केंद्र सरकारच्या आकडेवारीवरून तीन लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आली असून, ही कार्डे बोगस म्हणून रद्द केली गेली, तर खरी कारणे ही काहीतरी वेगळी आहेत, सांगितले जात आहे.

देशातील सुमारे ८० कोटी लोकं रेशन कार्ड धारक आहेत. त्यापैकी ग्रामीण आणि शहरी ग्रामीण भागात लोकांची संख्या अधिक आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे एकूण २३.५ कोटी रेशनकार्डांपैकी जवळपास ९० टक्के कार्ड्स आधीपासूनच आधार क्रमांकाशी जोडली गेली आहेत.

जनवितरण प्रणाली किंवा पीडीएसच्या आधारे सुमारे ८० कोटी लाभार्थ्यांपैकी ८५ टक्के आधार आकडेवारी त्यांच्या संबंधित शिधापत्रिकेशी जोडली गेली आहेत.

एखाद्याचे आधार कार्ड त्याच्या रेशन कार्डशी जोडलेले नसेल तर ते कनेक्ट करण्याचा सुलभ मार्ग सरकारच्या वतीने असल्याचेही म्हटले जाते. ही पद्धत ऑनलाईन आणि ऑफलाईन उपलब्ध आहे.