शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अजूनही 'पीएफ'चे व्याज मिळाले नाही? 'या' ठिकाणी करा तक्रार; जाणून घ्या सोपी पद्धत

By देवेश फडके | Published: January 22, 2021 4:36 PM

1 / 9
नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०१९-२० यासाठी अलीकडेच केंद्र सरकारकडून व्याज जाहीर करण्यात आले. पीएफ सभासदांच्या खात्यात व्याजाचा मोबदला देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र, काही सभासदांच्या खात्यावर अद्यापही 'पीएफ'वरील व्याज जमा झालेले नाही.
2 / 9
तीन आठवडे उलटून गेले, तरी व्याज जमा न झालेले सभासद याबाबत तक्रार करू शकतात. आपल्या पीएफ खात्यात व्याज जमा झाले की, नाही याची खातरजमा सभासदांना विविध पर्यायातून करता येते. मात्र, घोषित करण्यात आलेले व्याज मिळाले नाही, तर अशा सभासदांना तक्रार करता येते.
3 / 9
भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. पीएफ काढणे, पीएफ अकाउंट ट्रान्सफर करणे, वैयक्तिक ओळखपत्र, तसेच पीएफ संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास Grevens Management System च्या माध्यमातून पीएफ सभासदांना यासंदर्भातील तक्रार करता येऊ शकते.
4 / 9
याव्यतिरिक्त @socialepfo या ट्विटर हँडलवर देखील सभासदांना तक्रार करता येईल. पीएफ सभासदांनी सर्वप्रथम https://epfigms.gov.in/ (epfigms.gov.in) या लिंकवर जावे. त्यानंतर Register Grievance वर क्लिक करा.
5 / 9
सदर पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवीन वेबपेज समोर येईल. यात तुम्हाला 'स्टेटस' निवडावा लागेल. यात पीएफ मेंबर, ईपीएस पेंशनर , एम्प्लॉयर किंवा अन्य यांमधून कोणता तरी एक पर्याय निवडावा लागेल. तुमच्याकडे यूएएन किंवा पेंशन ऑर्डर नसेल, तर तुम्ही इतर पर्यायाची निवड करू शकता.
6 / 9
पीएफसंदर्भात तक्रार करण्यासाठी तुम्हांला PF member स्टेटस निवडता येईल. त्यानंतर तुमचा यूएएन आणि सिक्युरिटी कोड सादर करून Get Details क्लिक करावे. यामध्ये तुमचा तपशील सादर करावा लागेल. ओटीपीसाठी क्लिक केल्यानंतर नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.
7 / 9
ओटीपी सादर केल्यानंतर तुमच्या तपशीलाची छाननी केली जाईल आणि तुमची वैयक्तिक माहिती तुम्हाला येथे भरावी लागेल. यानंतर तुम्हाला पीएफ खाते क्रमांकाची निवड करावी लागेल, ज्याबाबत तुम्हाला तक्रार करायची आहे.
8 / 9
पुन्हा एक नवीन पेज समोर येईल ज्यात तुम्हाला तक्रार कशाशी संबंधित आहे त्याची माहिती द्यावी लागेल. तक्रार कोणत्या स्वरुपाची आहे, याची निवड केल्यानंतर तेथे आवश्यक माहिती सादर करावी. तुमच्याकडे काही पुरावा असेल तो सादर करावा लागेल.
9 / 9
एकदा तुमची तक्रार नोंद करून झाली की Add वर क्लिक करून सबमिट करावे. तुमच्या ऑनलाइन तक्राराचा नोंदणी क्रमांक नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडीवर प्राप्त होईल. क्रारीची दखल घेतली की नाही, याची माहिती याच वेबसाईटवरून घेता येईल.
टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीEmployeeकर्मचारी