नोव्हेंबरमध्ये सुट्ट्यांचा पाऊस; जाणून घ्या, अशी आहे बँकांची 'हॉलीडे लिस्ट'
By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 1, 2020 09:40 IST2020-11-01T09:31:58+5:302020-11-01T09:40:20+5:30

नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात दिवाळी, छठ, गुरु नानक जयंती सारखे अनेक उत्सव आहेत. यामुळे सर्वसाधारण महिन्यांच्या तुलनेत या महिन्यात सुट्ट्याही अधिक आहेत. तर येथे पाहा, नोव्हेंबर महिन्यात कोण-कोणत्या दिवशी असेल बँकांना सुट्टी...

सुट्टीनेच महिन्याची सुरुवात - या महिन्याच्या पहिच्याच दिवशी म्हणजे आज 1 नोव्हेंबरला रविवार आहे. या दिवशी आठवडी सुट्टी असते. या दिवशी बँका बंद असतात. आजचा दिवस वगळता या आठवड्यात बँकांना कुठलीही सुट्टी नाही. यानंतर 8 नोव्हेंबरला रविवार असल्याने सर्व राज्यांत बँकांना सुट्टी असेल.

14 नोव्हेंबरला दिवाळी - नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात 13 नोव्हेंबरला वांगाला उत्सव असल्याने शिलाँगमध्ये बँकांना सुट्टी असेल. यानंतर 14 नोव्हेंबरला दिवाळी अमावस्या (लक्ष्मी पूजन) आणि 15 नोव्हेंबरला रविवार असल्याने सर्वच राज्यांत बँकांना सुट्टी असेल.

16 नोव्हेंबरला भाऊबीज - 16 नोव्हेंबरला भाऊबीज आहे. त्यामुळे अधिकांश राज्यांत बँकांचे कामकाज होणार नाही.

17-18 नोव्हेंबरला सिक्किममध्ये सुट्टी - 17 आणि 18 नोव्हेंबरला सिक्किममध्ये बँकांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. येथे 16 ते 18 नोव्हेंबरपर्यंत दिवाळी साजरी केली जाईल.

20 आणि 21 नोव्हेंबरला छठ पुजा - 20 आणि 21 नोव्हेंबरला छठ पुजेचा उत्सव असल्याने बिहार आणि झारखंडमध्ये बँका बंद असतील. तसेच 22 नोव्हेंबरला रविवार असल्याने सर्वच राज्यांत बँकांना सुट्टी असेल.

28 नोव्हेंबर महिन्याचा चौथा शनिवार - 23 नोव्हेंबरला शिलाँगमध्ये बँका बंद असतील. तर 28 नोव्हेंबर महिन्याचा चौथा शनिवार असल्याने अधिकांश राज्यात बँकांना सुट्टी असेल.

30 नोव्हेंबरला गुरू नानक जयंती - 29 नोव्हेंबरला रविवार आहे, तर 30 नोव्हेंबरला गुरू नानक जयंती/कार्तिक पोर्णिमा आहे. या दिवशीही अधिकांश राज्यांतील बँकांना सुट्टी असेल.

















