शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Real Estate: प्लॉट खरेदी करावा की फ्लॅट? जास्त फायद्याचं काय?; वाचा कुठून मिळतील जास्त रिटर्न्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 6:42 PM

1 / 8
हाऊसिंग डॉट कॉमचे ग्रूप सीईओ ध्रूव अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार रहिवासी फ्लॅट्समध्ये गुंतवणूक करणं अधिक फायदेशीर ठरताना सध्या दिसून येत आहे. कारण मोठ्या शहरांमध्ये आता जमीनी शिल्लक राहिलेल्या नाहीत. जवळपास प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये मोठ्या जमिनींची कमतरता आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोना महामारीमध्ये प्लॉट्स आणि इंडिपेन्डंट प्लोअर्सच्या मागणीत वाढ झाली आहे.
2 / 8
प्रॉपटेक प्लॅटफॉर्म हाऊसिंग डॉटकॉमनं देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये एक रिसर्च केला. या रिसर्चमधून समोर आलेल्या माहितीनुसार २०१५ नुसार शहरातील प्लॉट्सच्या किमतीत दरवर्षी ७ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. तुलनेत अमार्टमेंटच्या किमतीत दरवर्षी केवळ २ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. अर्थात मोठ्या शहरांमध्ये जमीन मिळणं आता खूप कठीण गोष्ट होऊन बसली आहे.
3 / 8
देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये (दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि अहमदाबाद) लोक सामान्यत: प्लॉट्सच्या तुलनेत फ्लॅट खरेदी करणं अधिक पसंत करतात. या शहरांमध्ये फ्लॅट्सच्या लोकप्रियतेमागे सुरक्षा आणि इतर सुविधा हे मुख्य कारण असल्याचं दिसून आलं आहे.
4 / 8
जसं की अपार्टमेंटमध्ये पावर बॅकअप, कार पार्किंग, क्लब, जीम, स्विमिंग पूल आणि गार्डन एरिया इत्यादी सुविधा उपलब्ध होऊन जातात. प्लॉटमध्ये अशा सुविधांची कमतरता असते.
5 / 8
हाऊसिंग डॉटकॉमच्या अहवालानुसार आठ शहरांमध्ये फ्लॅट्सची मागणी अधिक असतानाही प्लॉट्सच्या किमतीचा बोलबाला अधिक आहे. सध्याच्या ट्रेंडनुसार फ्लॅटच्या तुलनेत प्लॉट्स तुम्हाला अधिक रिटर्न्स मिळवून देतात. रिसर्च हेड अंकिता सूद यांच्या दाव्यानुसार गुरूग्राममधील प्रमुख परिसर आणि दक्षिण भारताताली हैदराबाद, बंगळुरू आणि चेन्नईत विशेषत: २०१८ सालानंतर रेसिडेन्शियल प्लॉट्सच्या किमतीत दुपटीनं वाढ झाली आहे.
6 / 8
शहरात जमीनीच्या किमतीत १३ ते २१ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. तर गेल्या तीन वर्षात अपार्टमेंटच्या किमतीत २ ते ६ टक्क्यांच्या घरात वाढ झाली आहे. कोरोना महामारी आणि वैयक्तिक सकारात्मक बदलाच्या भावनेनं प्रेरित होऊन येत्या तिमाहीत मागणी आणखी वाढू शकते असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
7 / 8
वर्ष २०१८ ते २०२१ या कालावधीत हैदराबादमध्ये २१ टक्के कम्पाऊंड वार्षिक वृद्धी दरात प्लॉट्समध्ये सर्वाधिक वृद्धी पाहायला मिळाली आहे. शंकरपल्ली आणि पाटनचेरी, तुक्कुगुडा, महेश्वरम आणि शादनगर हैदराबाद या जागा अव्वल स्थानी होत्या. याठिकाणी २०२१ या वर्षात मागणी आणि किंमत या दोन्ही विभागात वृद्धी पाहायला मिळाली आहे. चेन्नईत प्लॉट्सच्या किमतीत २०१८-२०२१ मध्ये तब्बल १८ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
8 / 8
दिल्ली-एनसीआरच्या बाजाराचा विचार करायचा झाल्यास गुरूग्राम येथे रेसिडेन्शियल प्लॉट्सच्या किमतीत २०१८ ते २०२१ या कालावधीत १५ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. द्वारका एक्स्प्रेसवे सोबतच सेक्टर ९९, सेक्टर १०८, न्यू गुरूग्राममध्ये सेक्टर ९५ ए, सेक्टर ७० ए आणि सेक्टर ६३ मध्ये निवासी जमीनीच्या दरात २०२१ मध्ये वाढ पाहायला मिळाली आहे.
टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योगbusinessव्यवसाय