कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 14:06 IST2025-06-26T14:01:10+5:302025-06-26T14:06:18+5:30

Car on loan: कार खरेदी करताना अनेकांचा कल रोख पैसे देण्याचा असतो, तर काहींचे मत असते की कर्ज काढून घ्यायची. या दोन्हीपैकी कोणता पर्याय फायद्याचा आहे?

कार खरेदी करताना रोख रक्कम भरणे हा सर्वोत्तम पर्याय आहे असे अनेकांना वाटते, परंतु प्रत्यक्षात, कर्जावर कार खरेदी करणे अधिक फायदेशीर कसे ठरते ते जाणून घेऊ...

रोख रकमेचा हा आहे फायदा: जर तुम्ही रोखीने कार खरेदी केली तर तुमच्याकडील रोख रक्कम कमी होते. मात्र कर्ज काढून घेतली तर तुम्ही दरमहा ईएमआय भरू शकता आणि उर्वरित पैसे गुंतवणूक किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी वाचवू शकता.

टॅक्स वाचतो का ? : जर कार व्यवसायासाठी वापरली जात असेल, तर कार कर्जाच्या ईएमआयच्या व्याजाचा भाग कर कपात म्हणून दावा केला जाऊ शकतो. यामुळे तुमचा टॅक्स वाचू शकतो.

क्रेडिट स्कोअर मजबूत होतो: वेळेवर ईएमआय भरल्याने तुमचा सिबील स्कोअर वाढतो. यामुळे भविष्यात कर्ज घेणे सोपे होते.

सवलती आणि ऑफर : सणासुदीच्या काळात किंवा ऑफर्सदरम्यान बँका आणि डीलरशिप दोन्हीकडून कार कर्जावर सवलती, कमी व्याजदर किंवा कॅशबॅक दिले जातात, ज्यामुळे कर्ज घेणे अधिक फायदेशीर ठरते.

विमा, अतिरिक्त फायदे : जेव्हा तुम्ही कर्ज घेता तेव्हा तुम्हाला मोफत विमा, रोडसाइड असिस्टंट किंवा अतिरिक्त वॉरंटीसारखे फायदे मिळतात, जे रोख पेमेंटवर उपलब्ध नसतात.

हे लक्षात ठेवा : व्याजदरांची तुलना करा I ईएमआय उत्पन्नाच्या ४० टक्के पेक्षा जास्त नसावा I वेळेवर पैसे भरा आणि दंडाचा धोका टाळा.