SIP Investment : ५ वर्षांपर्यंत चालवा ₹५००, ₹१०००, ₹१५००, ₹२००० ची SIP; किती मिळेल रिटर्न? पाहा कॅलक्युलेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 09:24 IST2025-01-03T09:04:06+5:302025-01-03T09:24:32+5:30

SIP Investment Calculation: हल्ली अनेक जण भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक करताना दिसतात. गुंतवणूकीच्या पारंपारिक पद्धतींऐवजी अनेक जण आजकाल शेअर बाजारात आपले पैसे गुंतवू लागले आहेत.

SIP Investment Calculation: हल्ली अनेक जण भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक करताना दिसतात. गुंतवणूकीच्या पारंपारिक पद्धतींऐवजी अनेक जण आजकाल शेअर बाजारात आपले पैसे गुंतवू लागले आहेत. शेअर बाजारात जोखीम जरी अधिक असली तरी त्यातून मिळणारा परतावा हा अधिक असल्यानं अनेक जण त्याकडे वळू लागले आहेत.

वेल्थ क्रिएशनच्या दृष्टीनं एसआयपी SIP Mutual Funds हा आजच्या काळात गुंतवणुकीचा खूप चांगला पर्याय मानला जातो. एसआयपी परतावा दीर्घ मुदतीसाठी खूप चांगला मानला जातो. तुम्ही त्यात जितकी जास्त काळ गुंतवणूक कराल तितके जास्त पैसे जोडता येतील.

विशेष म्हणजे यात तुम्ही फक्त ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. ५००, १०००, १५०० आणि २००० रुपयांचे एसआयपी सलग ५ वर्षे चालवल्यास तुम्ही किती पैसे कमवू शकता हे जाणून घेऊ.

५०० रुपयांची एसआयपी - एसआयपीचा सरासरी परतावा १२ टक्के मानला जातो. जर तुम्ही ५ वर्षांसाठी ५०० रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्ही एकूण ३०,००० रुपयांची गुंतवणूक कराल. १२ टक्के दरानं तुम्हाला ११,२४३ रुपयांचा परतावा मिळेल. अशा प्रकारे ५ वर्षांनंतर तुम्हाला एकूण ४१,२४३ रुपये मिळतील.

१००० रुपयांची एसआयपी - जर तुम्ही ५ वर्षांसाठी १,००० रुपयांची एसआयपी चालवत असाल तर तुम्ही एकूण ६०,०० रुपयांची गुंतवणूक कराल. १२ टक्के परताव्यानुसार तुम्हाला २२,४८६ रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे ५ वर्षांनंतर तुम्हाला एकूण ८२,४८६ रुपये मिळतील.

१५०० रुपयांची एसआयपी - जर तुम्ही दर महिन्याला एसआयपीमध्ये १,५०० रुपयांची गुंतवणूक केली आणि ५ वर्षे ती सतत चालवत असाल तर तुम्ही ५ वर्षात एकूण ९०,००० रुपयांची गुंतवणूक कराल. १२ टक्के दरानं तुम्हाला ३३,७३० रुपये व्याज मिळेल आणि ५ वर्षांनंतर तुम्हाला एकूण १,२३,७३० रुपये मिळतील.

२ हजार रुपयांची एसआयपी - जर तुम्ही सलग २,००० रुपयांची एसआयपी ५ वर्षे चालवत असाल तर ५ वर्षात तुम्ही एकूण १,२०,००० रुपयांची गुंतवणूक कराल. तुम्हाला १२ टक्के व्याजासह ४४,९७३ रुपये मिळतील आणि ५ वर्षात एकूण १,६४,९७३ रुपये जमवाल.

एसआयपी ही मार्केट लिंक्ड स्कीम आहे, त्यामुळे त्यात परताव्याची शाश्वती नसते. सरासरी परतावा १२ टक्के मानला जात असल्यानं येथील मोजणी १२ टक्क्यांनुसार करण्यात आली आहे. कधीकधी परतावा यापेक्षा चांगला किंवा कमी असू शकतो. एसआयपीमध्ये तुम्हाला कंपाउंडिंगचा फायदा मिळतो आणि लाँग टर्ममध्ये तुम्हाला रुपी कॉस्ट एव्हरेजिंगचा फायदा मिळतो.

याशिवाय अन्य कोणत्याही योजनेत १२ टक्के परतावा मिळत नाही, त्यामुळे संपत्ती निर्मितीच्या दृष्टीनं ही योजना चांगली मानली जाते. तुम्ही त्यात जितका जास्त वेळ गुंतवणूक कराल तितका चांगला नफा कमावू शकाल. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.