'या' 10 गुंतवणूक योजना तुमच्या मुलीला देतील आयुष्यभर संरक्षण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 17:02 IST2022-10-11T16:36:00+5:302022-10-11T17:02:43+5:30
International Day of the Girl Child : तुम्ही म्युच्युअल फंड, सुकन्या, पीपीएफ, एफडी, आरडी यासह अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.

नवी दिल्ली : जगभरातील मुलींचे शिक्षण, संरक्षण आणि बालविवाह याबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी इंटरनॅशनल डे ऑफ द गर्ल चाइल्ड (International Day of the Girl Child) साजरा केला जातो. आज या निमित्ताने आम्ही तुम्हाला मुलींना आर्थिक सुरक्षा देण्याचे पर्याय सांगणार आहोत.
या 10 पर्यायांपैकी कोणताही पर्याय निवडल्यास तुमच्या मुलीचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होईल. तुम्हीही तुमच्या मुलीचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याचा विचार करत असाल, तर गुंतवणूक करू शकता. यासाठी तुम्ही म्युच्युअल फंड, सुकन्या, पीपीएफ, एफडी, आरडी यासह अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.
सुकन्या समृद्धी योजना
केंद्र सरकारने मुलींच्या आर्थिक सुरक्षेसाठी ही योजना सुरू केली होती. तुम्ही जास्तीत जास्त दोन मुलींच्या नावाने बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या खाते उघडू शकता. यामध्ये वर्षाला किमान 1,000 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. या योजनेवर सरकार सध्या 7.6 टक्के व्याज देत आहे. मुलीची 21 वर्षे पूर्ण झाल्यावर खाते मॅच्योर होईल.
चिल्ड्रन गिफ्ट म्युच्युअल फंड
हा म्युच्युअल फंड खास मुलींसाठी तयार करण्यात आला आहे. यामध्ये गुंतवलेले पैसे डेट आणि इक्विटी या दोन्ही पर्यायांमध्ये जातात. याचा लॉक-इन कालावधी 18 वर्षांचा आहे, जो दीर्घ कालावधीत मोठा निधी तयार करण्यात मदत करतो.
एनएससीवर चांगला परतावा
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) ही पोस्ट ऑफिसची एक विशेष योजना आहे, जी मुलींसाठी राबविली जाते. यावर हमी परतावा मिळतो. सरकार सध्या NSC वर 7.6 टक्के वार्षिक व्याज देत आहे. यामध्ये किमान 1,000 रुपये गुंतवू शकतात, तर कमाल मर्यादा नाही. त्याचा कार्यकाळ 5 वर्षांचा आहे, ज्यावर कर सूट देखील उपलब्ध आहे.
पोस्ट ऑफिस टर्म डिपॉजिट
पाच वर्षांचा लॉक-इन कालावधी असलेली ही योजना मुलींसाठी खूप खास मानली जाते. हे खाते देशात कुठेही हस्तांतरित केले जाऊ शकते. यामध्ये कोणीही किमान 1,000 रुपये गुंतवू शकतो, तर कमाल मर्यादा नाही. याचे व्याज सुद्धा वेळोवेळी बदलत असते.
युलिप योजना
युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (ULIP) हा मुलींसाठी गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे, जो जीवन विम्याच्या संरक्षणासह हमी परतावा देतो. पालकांचे निधन झाल्यास, विमा कंपनी प्रीमियम देखील भरते. याशिवाय, विमा कंपनी पालकांच्या अनुपस्थितीत मुलीच्या शिक्षणाचा खर्च देखील उचलते आणि तिला एकरकमी रक्कम देखील देते.
सिपद्वारे मिळू शकतो मोठा निधी
म्युच्युअल फंडाच्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे मुलींसाठी मोठा निधी तयार केला जाऊ शकतो. बँकेत एसआयपी खाते उघडल्यानंतर तुमच्या गुंतवणुकीचे पैसे इक्विटी, डेट आणि मिक्स्ड फंड्समध्ये गुंतवले जातात, जे भविष्यात मोठा निधी तयार करण्यास मदत करतात.
पोस्ट ऑफिस आरडी
पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिट (आरडी) उघडून तुम्ही तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करू शकता. सहसा त्याची परिपक्वता पाच वर्षांची असते, परंतु पालक जाड कॉर्पस तयार करण्यासाठी कालावधी वाढवू शकतात. यामध्ये गुंतवणूक करणे पूर्णपणे जोखीममुक्त आहे आणि त्यावर निश्चित व्याज आहे.
पीपीएफ सर्वात चांगले
तुम्ही तुमच्या मुलाच्या नावावर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खाते देखील उघडू शकता. याची म्यॅच्योरिटी 15 वर्षांची आहे, जी 5 वर्षांनी वाढविली जाऊ शकते. बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये हे खाते उघडून दरमहा किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. वार्षिक करता येणारी कमाल गुंतवणूक 1.5 लाख रुपये आहे, ज्यावर 7.10 टक्के व्याज उपलब्ध आहे.
गोल्ड ईटीएफ
प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी पालकांनी आपल्या मुलींसाठी गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करावी. यामध्ये सोने सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्याही लॉकरची गरज नाही किंवा ते चोरीला जाण्याची भीतीही नाही. तसेच शेअर बाजाराप्रमाणे तेही परतावा देते, तर सोन्याच्या बाजारभावात वाढ झाली की सोन्याच्या किमतीतही वाढ होते.