तुम्ही रिल्स पाहत राहिला; त्या काळात त्यांनी कमावले अडीच लाख कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 14:51 IST2025-03-28T14:48:13+5:302025-03-28T14:51:16+5:30
indians spent 1 lakh crore hours on phone : भारतीयांनी स्मार्टफोनवर १.१ लाख कोटींहून अधिक तास घालवले आहेत. तुमच्या रिल्स पाहण्याच्या काळात त्यांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत.

स्मार्टफोन वापरणाऱ्याने एकदाही रिल पाहिली नाही, असा माणूस पृथ्वीतलावर सोधूनही सापडणार नाही. इतकी प्रचंड त्याची लोकप्रियता वाढली आहे. व्हॉट्सअप, युट्यूब, इन्स्टाग्रामपासून फेसबुकपर्यंत असंख्या सोशल साईट्सवर तुम्हाला रिल्स पाहायला मिळतात.
इकडे तुम्ही रिल्स पाहत असताना तिकडे लोकांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. याविषयी नुकताच एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. भारतीयांनी स्मार्टफोन आणि मनोरंजन माध्यमांवर १.१ लाख कोटींहून अधिक तास घालवले आहेत.
आजकाल कुठेही पाहिलं तरी बहुतेक लोक मोबाईलमध्ये डोकं खुपसून काहीतरी पाहत असल्याचं दिसतं. मोकळ्या वेळीच नाही तर खाताना, पिताना, प्रवास करताना अगदी टॉयलेटमध्ये काहीजण मोबाईल घेऊन जातात.
आजकाल फक्त तुम्हीच नाही तर संपूर्ण देशाची मोठी लोकसंख्या हे करत आहे. मग ती मेट्रो असो वा हॉटेल. घरात एकत्र जेवण्याची जागा असो किंवा स्वतःच्या खोलीत, लोक आपल्या फोनमध्ये व्यग्र असतात. याचा फायदा मनोरंजन कंपन्यांना होत आहे.
माहितीनुसार, भारतीय लोक त्यांचे फोन १.१ लाख कोटी तास वापरतात आणि यातून OTT प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाखो कोटींची कमाई करतात.
देशातील लोक दररोज सरासरी ५ तास त्यांचा फोन वापरतात. त्यातही ७० टक्के लोकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, व्हिडिओ प्लॅटफॉर्म आणि गेमिंग करताना फोनचा वापर केला आहे.
फोन वापरणाऱ्या लोकांमुळे देशातील मीडिया आणि मनोरंजन उद्योग २०२४ पर्यंत २.५ लाख कोटी रुपयांचा झाला आहे, ज्याने पहिल्यांदाच टेलिव्हिजनला मागे टाकले आहे. २०२४ मध्ये, मनोरंजन उद्योगाला टेलिव्हिजनपेक्षा जास्त फायदा झाला आहे.