भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 16:05 IST2025-05-02T15:57:43+5:302025-05-02T16:05:41+5:30
Indians earned 21000 crore from youtube: प्रत्येकाच्या हातात मोबाईल... इंटरनेटही स्वस्त झाले. त्यामुळे डिजिटल बाजारपेठ प्रचंड वेगाने वाढत आहे. यु ट्यूबसारख्या डिजिटल माध्यमावर यूजर्सची संख्या वाढली असून, त्याचा फायदा क्रिएटर्संना होत आहे.

कधी काळी क्वचितच बघितल्या जाणाऱ्या यु ट्यूबवर सगळंच काही उपलब्ध झाले आहे. ताज्या माहितीपासून ते अनेकांगी विषयावरील विश्लेषण, भरपूर मनोरंजन असं सगळं... यु ट्यूबमधून पैसे मिळत असल्याने क्रिएटर्संची संख्याही वाढली आहे.
लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना सहज वापरत्या येणाऱ्या या प्लॅटफॉर्ममधून कॉन्टेट क्रिएट करणाऱ्यांना भरपूर पैसे मिळत आहे. अनेकांनी नोकरी सोडून यु ट्यूबच्या माध्यमातून कमाई करण्यावर भर दिला आहे.
मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड ऑडियो, व्हिज्युअल अॅण्ड एंटरटेनमेंट समिटमध्ये यु ट्यूबचे सीईओंनी भारतातील भविष्यातील वाढीबद्दल आणि गुंतवणुकीबद्दल भाष्य केले.
सीईओ नील मोहन यांनी सांगितले की, मागील एक वर्षात तब्बल १०० मिलियन कॉन्टेट क्रिएटर्संनी यु ट्यूबवर सहभाग नोंदवला आहे. जगामध्ये भारताला क्रिएटर्स नेशन म्हणून बघायला हवं, असेही ते म्हणाले.
नील मोहन यांनी सांगितले की, भारतात गेल्या एका वर्षात यु ट्यूब चॅनेलवर १५००० हजार असे चॅनेल आहेत की ज्यांचे सबस्क्राईबर्संची संख्या १० लाखांच्या पुढे गेले आहे.
मागील तीन वर्षात यु ट्यूबवर असलेल्या कॉन्टेट क्रिएटर्संना तब्बल २१००० कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे दिले गेले आहेत. यु ट्यूब भारतीय क्रिएटर्संना खूप चांगले पैसे देत आहे. त्याचबरोबर त्यांना ओळखही मिळत आहे, असे मोहन म्हणाले.
यु ट्यूबच्या भविष्यातील गुंतवणुकीच्या प्लॅनबद्दलही नील मोहन यांनी माहिती दिली. आम्ही सध्या गुंतवणूक वाढवण्यावर विचार करत आहोत. पुढील दोन वर्षात आम्ही ८५० कोटी रुपये गुंतवणूक करणार आहोत. त्यामुळे क्रिएटर्संना ज्यास्त संधी मिळणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.