पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 15:41 IST2025-10-07T15:22:28+5:302025-10-07T15:41:02+5:30

Gold Silver Rate : गेल्या काही काळापासून भारतात आणि जगभरात सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत. आपला देशारी देश पाकिस्तानमध्ये काय स्थिती आहे?

गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत झालेली वाढ आश्चर्यजनक आहे. इंडियन बुलियन ॲण्ड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), १० ग्रॅम सोन्याचा (२४ कॅरेट) दर १,१९,०५९ रुपयांवर पोहचला आहे.

सोन्याच्या किमतीमध्ये यावर्षी ५३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. यापूर्वी २००८ ते २०११ या काळात १००% आणि २०२० मध्ये ५०% पेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आली होती.