गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 16:03 IST2025-04-25T15:58:24+5:302025-04-25T16:03:40+5:30

गुंतवणुकीतून चांगला परतावा यावा, अशी सगळ्यांनाच अपेक्षा असते. पण जागतिक घडामोडी आणि इतर घटकांमुळे तुमच्या गुंतवणुकीवरील परताव्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल, याबद्दल जाणून घ्या.

मागील सहा महिन्यांत शेअर बाजारात मोठे चढ-उतार सुरू आहेत. त्यामुळे परतावा घटला आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत मीडकॅप आणि स्मॉलकॅप फंड्समध्ये ११ टक्के घसरण झाली आहे.

अशा परिस्थितीत संपत्ती निर्मितीसाठी स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरण्याची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे. मागील सहा महिन्यांत शेअर बाजारात मोठे चढ-उतार सुरू आहेत.

त्याचा परिणाम म्हणून परतावा घटला आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत मीडकॅप आणि स्मॉलकॅप फंड्समध्ये ११ टक्के घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत संपत्ती निर्मितीसाठी स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरण्याची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे.

वेगवेगळ्या मालमत्ता श्रेणीत गुंतवणूक करावी. पोर्टफोलिओतील ५ ते १० टक्के गुंतवणूक सोन्यात असावी. डेब्ट फंडांत, गिल्ट फंड, डायनॅमिक बाँड फंडांत गुंतवणूक करावी. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक उत्पन्न देते. या पर्यांयांबद्दलही जाणून घ्या.

पहिलं म्हणजे शेअर बाजार. सध्या लार्जकॅप फंड्स स्थिर आहेत. यंदा आतापर्यंत केवळ २ टक्के परतावा मिळाला आहे. दुसरं म्हणजे मुदत ठेवी. व्याज दर घटल्यामुळे १ ते १० वर्षांच्या मुदत ठेवी ६ ते ७ टक्के परतावा देत आहेत.

तिसरा पर्याय आहे सोने-चांदीमध्ये गुंतवणुकीचा. यंदा चांदीने १५ टक्के, तर सोन्याने ४७ टक्के परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूक फायद्यात आली.

टीप: कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.