तुमच्याकडे Airtelचे सिम कार्ड आहे का? असल्यास मिळेल 4 लाखांचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 01:39 PM2021-09-09T13:39:30+5:302021-09-09T13:50:42+5:30

Airtel : एअरटेल सिम असेल तर तुम्हाला थेट 4 लाख रुपयांचा लाभ मिळेल.

नवी दिल्ली : एअरटेल ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दरम्यान, कंपनी आपल्या ग्राहकांना रिचार्ज प्लॅनवर 4 लाख रुपयांचा थेट लाभ देत आहे. 279 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर हा लाभ उपलब्ध आहे. याचा अर्थ जर तुमच्याकडे एअरटेल सिम असेल तर तुम्हाला थेट 4 लाख रुपयांचा लाभ मिळेल.

सहसा, जीवन विमा किंवा आरोग्य विम्याचा लाभ घेण्यासाठी प्रीमियम भरावा लागतो, परंतु काही कंपन्या किंवा सरकारी योजना तुम्हाला जीवन किंवा आरोग्य विमा मोफत देतात. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल ...

एअरटेल आपल्या दोन प्रीपेड रिचार्जसोबत विनामूल्य मुदत जीवन विमा देते. हे प्लॅन 279 आणि 179 रुपयांचे रिचार्ज आहेत. 279 रुपयांच्या योजनेवर 4 लाख रुपयांचा मुदत जीवन विमा इतर लाभांसह उपलब्ध आहे. त्याचबरोबर 179 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जवर 2 लाखांचा जीवन विमा आहे.

जनधन योजनेअंतर्गत उघडल्यानंतर बँक खात्यासह मिळणाऱ्या रुपे डेबिट कार्डवर 30 हजार रुपयांचे जीवन विमा संरक्षण आणि 2 लाख रुपयांचे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण आहे.

पंजाब नॅशनल बँक रुपे प्लॅटिनम डेबिट कार्डवर (RuPay Platinum Debit Card ) 2 लाख रुपयांचा विनामूल्य अपघाती विमा देते. यासह, आपल्याला अनेक विशेष फायदे देखील मिळतील.

ईपीएफओ सदस्यांना विमा संरक्षणची सुविधा एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI Insurance cover)अंतर्गत देखील मिळते. योजनेमध्ये नामनिर्देशित व्यक्तीला जास्तीत जास्त 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.

एलपीजी कनेक्शनसह, ग्राहकाला वैयक्तिक अपघाताचे संरक्षण मिळते. एलपीजी सिलेंडरमधून गॅस गळती किंवा स्फोट झाल्यामुळे दुर्दैवी अपघात झाल्यास 50 लाख रुपयांपर्यंतचा हा विमा आर्थिक मदतीच्या स्वरूपात आहे.

Read in English