By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 17:28 IST
1 / 10तुमचा डीमॅट खाते क्रमांक, युझर आयडी, पासवर्ड आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे OTP कोणाशीही शेअर करू नका. फोनवर किंवा मेसेजवर स्वतःला ब्रोकर किंवा डिपॉझिटरी प्रतिनिधी सांगणाऱ्या व्यक्तीला ही माहिती देणे टाळा.2 / 10अनेकजण पासवर्ड किंवा लॉगिन डिटेल्स मोबाईलच्या 'नोट्स'मध्ये किंवा डायरीमध्ये लिहून ठेवतात. मोबाईल हरवल्यास किंवा हॅक झाल्यास ही माहिती सहज चोरीला जाऊ शकते. ही माहिती लक्षात ठेवणे किंवा अत्यंत सुरक्षित ठिकाणी 'एनक्रिप्टेड' स्वरूपात ठेवणे उत्तम.3 / 10तुमचा पासवर्ड तुमचा वाढदिवस, नाव किंवा मोबाईल नंबर नसावा. पासवर्डमध्ये मोठी आणि लहान अक्षरे (A/a), संख्या (123) आणि विशेष चिन्हे (@, #, $) यांचा समावेश असावा, जेणेकरून तो ओळखणे कठीण होईल.4 / 10एकाच प्रकारचा पासवर्ड वर्षानुवर्षे वापरू नका. दर २ ते ३ महिन्यांनी तुमचा पासवर्ड बदलण्याची सवय लावा. यामुळे खात्याची सुरक्षा अधिक भक्कम होते.5 / 10तुमच्या खात्यातील प्रत्येक हालचालीचे (शेअर्सची खरेदी-विक्री किंवा ट्रान्सफर) अलर्ट्स त्वरित मिळवण्यासाठी SMS आणि ईमेल नोटिफिकेशन नेहमी 'ऑन' ठेवा.6 / 10विमानतळ, रेल्वे स्टेशन किंवा मॉल मधील Public Wi-Fi वरून कधीही डीमॅट खाते लॉगिन करू नका. अशा नेटवर्कवर तुमची माहिती चोरणे हॅकर्ससाठी सोपे असते. नेहमी स्वतःचा मोबाईल डेटा किंवा सुरक्षित घरगुती नेटवर्क वापरा.7 / 10काम संपल्यानंतर केवळ टॅब किंवा ॲप बंद करू नका, तर रीतसर 'लॉगआऊट' करा. विशेषतः जर तुम्ही दुसऱ्याच्या लॅपटॉप किंवा संगणकावरून लॉगिन केले असेल, तर ही खबरदारी अत्यंत महत्त्वाची आहे.8 / 10जर तुम्ही दीर्घकाळ शेअर्सची खरेदी-विक्री करणार नसाल, तर तुमचे डीमॅट खाते तुम्ही तात्पुरते 'फ्रीज' करू शकता. यामुळे तुमच्या संमतीशिवाय शेअर्सचे कोणतेही व्यवहार होऊ शकणार नाहीत. गरज पडल्यास ते सहज अनफ्रीज करता येते.9 / 10जर तुमच्या खात्यात तुमच्या माहितीशिवाय एखादा व्यवहार झाल्याचे दिसले, तर वेळ न घालवता त्वरित तुमच्या ब्रोकरला किंवा NSDL/CDSL या डिपॉझिटरीजना कळवा.10 / 10नेहमी ब्रोकरच्या अधिकृत वेबसाईट किंवा प्ले स्टोअरवरील व्हेरिफाईड ॲपवरूनच व्यवहार करा. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करून तुमची लॉगिन माहिती भरू नका.