क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट्स कसे रिडीम करायचे; 'या' आहेत ३ सोप्या स्टेप्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 17:03 IST2025-02-09T16:54:36+5:302025-02-09T17:03:50+5:30
Credit Card Tips : क्रेडिट कार्डच्या वापरावर मिळालेले रिवॉर्ड पॉइंट वेगवेगळ्या प्रकारे रिडीम केले जाऊ शकतात. आपण इथे ३ वेगवेगळ्या पद्धती सांगणार आहोत.

सर तुम्हाला क्रेडिट कार्डची गरज आहे का? आमची बँक तुम्हाला फ्री ऑफर करत आहे, अशा आशयाचे फोन तुम्हाला येत असतीलच. किंवा तुमच्याकडेही बँक किंवा एखाद्या वित्तीय संस्थेचे क्रेडिट कार्ड असू शकते. क्रेडिट कार्ड तुम्हाला वस्तू खरेदी करण्याची आणि रोख पैसे न देता सेवा वापरण्याची सुविधा देते.
क्रेडिट कार्ड वापरण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही व्यवहारांसाठी रिवॉर्ड पॉइंट मिळवू शकता. पण, फक्त रिवॉर्ड पॉइंट्स मिळवून उपयोग नाही. ते तुम्हाला ते कसे वापरायचे हे देखील माहिती पाहिजे.
क्रेडिट कार्ड कंपन्या/बँका कार्ड वापराला प्रोत्साहन देण्यासाठी रिवॉर्ड पॉइंट ऑफर करतात. हे रिवॉर्ड पॉइंट्स तुम्ही तुमच्या खर्चाच्या आधारे कमावलेल्या आभासी पैशासारखे आहेत. तुमच्याकडे असलेल्या कार्डचा प्रकार आणि तुमच्या खर्चाची पद्धत तुम्हाला किती पॉइंट्स मिळतील हे ठरवेल.
तुम्ही ठराविक रक्कम खर्च करता तेव्हा काही क्रेडिट कार्ड तुम्हाला बोनस पॉइंट देतात. रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्याची पद्धत तुमची बँक आणि क्रेडिट कार्ड प्रकारावर अवलंबून असते.
ऑनलाइन पद्धत : तुम्हाला क्रेडिट कार्ड देणारी बँक किंवा कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलवर लॉग इन करा. आयडी नंबर आणि पासवर्ड टाका. रिवॉर्ड रिडीम करण्यासाठी पर्याय पहा. तुम्ही उत्पादन किंवा व्हाउचर निवडल्यानंतर, त्याची पुष्टी करून ऑर्डर अंतिम करा.
ऑफलाइन पद्धत : तुमच्या बँकेच्या जवळच्या शाखेला भेट द्या आणि अवॉर्ड रिडेम्शन फॉर्म गोळा घ्या. तो भरुन क्रेडिट कार्ड विभागाकडे पाठवा. पूर्तता प्रक्रियेस १-१५ दिवस लागू शकतात.
कस्टमर केअर : तुमच्या रिडेम्पशन पर्यायांबद्दल जाणून घेण्यासाठी कस्टमर केअरला कॉल करा. काही जारीकर्ते तुम्हाला रिडेम्पशन फॉर्म डाउनलोड आणि मेल करण्यास सांगू शकतात. काही कंपन्या यासाठी शुल्कही आकारतात.