'Big Daddy of SUVs' महिंद्रा Scorpio-N घरी आणायची आहे? जाणून घ्या किती असावा तुमचा पगार आणि EMI चं गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 08:36 IST2026-03-05T08:19:31+5:302026-03-05T08:36:57+5:30

Mahindra Scorpio-N On EMI: भारतीयांच्या मनावर राज्य करणारी 'Big Daddy of SUVs' म्हणजेच महिंद्रा स्कॉर्पिओ-N आज प्रत्येक तरुण आणि कुटुंबाची पहिली पसंती बनली आहे.

Mahindra Scorpio-N On EMI: भारतीयांच्या मनावर राज्य करणारी 'Big Daddy of SUVs' म्हणजेच महिंद्रा स्कॉर्पिओ-N आज प्रत्येक तरुण आणि कुटुंबाची पहिली पसंती बनली आहे. या कारचे अनेक चाहते आहेत. तसंच ही कार जेव्हा लाँच झाली तेव्हा याला मोठ्या प्रमाणात ग्राहकांची पसंती मिळाली होती.

पण फक्त पसंती असणे पुरेसे आहे का? ही गाडी घरी आणण्यासाठी तुमच्या बँक खात्याची स्थिती कशी असावी आणि तुमच्या मासिक उत्पन्नाचे गणित काय असावं, हे आपण सविस्तर समजून घेऊया.

स्कॉर्पिओ-N ची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹१४ लाखांपासून सुरू होऊन ₹२५ लाखांपर्यंत (टॉप मॉडेल) जाते. जर आपण याच्या सर्वात लोकप्रिय Z4 किंवा Z6 डिझेल व्हेरियंटबद्दल बोललो, तर ऑन-रोड किंमत (विमा, आरटीओ आणि इतर करांसह) सुमारे ₹१८ लाख ते ₹२० लाखांच्या दरम्यान असते.

समजा तुम्ही स्कॉर्पिओ-N चं एक मिड व्हेरियंट निवडलं ज्याची ऑन-रोड किंमत ₹१९ लाख आहे. तर यासाठी तुम्हाला डाउन पेमेंट किती करावं लागेल हे पाहू. सुरक्षित आर्थिक नियोजनासाठी तुम्ही किमान २०% म्हणजेच ₹३.८० लाखांचं डाउन पेमेंट केलं पाहिजे.

तर यासाठी तुम्हाला उर्वरित रक्कम बँकेकडून कर्जाच्या स्वरुपात घ्यावी लागेल. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून एकूण ₹१५.२० लाखांचं कर्ज घ्यावं लागेल.

किती असू शकतो व्याजदर आणि कालावधी? जर तुम्ही ९.५% सरासरी व्याजदरानं ५ वर्षांसाठी (६० महिने) कर्ज घेतलं, तर तुमचा मासिक EMI सुमारे ₹३१,९०० असेल.

आर्थिक जगतात एक 'थंब रुल' आहे - २०/४/१० चा नियम. याचा अर्थ असा की, तुमच्या कारचा EMI तुमच्या इन-हँड सॅलरीच्या २५% ते ३०% पेक्षा जास्त नसावा. जर तुमचा EMI ₹३२,००० असेल, तर तुमचा मासिक इन-हँड पगार किमान ₹१ लाख ते ₹१.२० लाख असावा.

यामुळे कारचा हप्ता भरल्यानंतरही तुमच्याकडे घरखर्च, गुंतवणूक आणि आपत्कालीन निधीसाठी पुरेसे पैसे शिल्लक राहतील. तुमच्यावर दुसरं कोणतेही कर्ज (उदा. होम लोन किंवा पर्सनल लोन) नसेल, तर ₹८०,००० पगारावरही तुम्ही जोखीम घेऊ शकता, परंतु हे थोडे तणावपूर्ण असू शकतं.

परंतु काही छुपे खर्च विसरू नका. कार घेतल्यानंतर तुम्हाला फक्त EMI भरणं पुरेसं नाही. स्कॉर्पिओ-N सारख्या मोठ्या SUV सोबत इतर खर्चही येतात. जसं की इंधन. महिन्यात १,००० किमी प्रवासासाठी सुमारे ₹८,०००-₹१०,००० खर्च येऊ शकतो. मेंटेनन्स: वार्षिक सर्व्हिसिंग आणि विमा नूतनीकरणासाठी दरमहा ₹२,०००-₹३,००० वेगळे ठेवावे लागतील.