SBI मधून ₹७५ लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती असली पाहिजी Salary, किती लागेल EMI?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 09:22 IST2026-03-16T08:34:01+5:302026-03-16T09:22:39+5:30

SBI Home Loan: आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाची इच्छा असते. सध्या अनेक शहरांमध्ये घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळेच आपल्या स्वप्नातलं घर विकत घेण्यासाठी हल्ली अनेक जण बँकांकडून होम लोन घेण्याचा पर्याय स्वीकारतात.

SBI Home Loan: आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाची इच्छा असते. सध्या अनेक शहरांमध्ये घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळेच आपल्या स्वप्नातलं घर विकत घेण्यासाठी हल्ली अनेक जण बँकांकडून होम लोन घेण्याचा पर्याय स्वीकारतात.

गेल्या वर्षी रेपो रेटमध्ये १.२५ टक्क्यांची कपात झाल्यानं होम लोनचे व्याजदर कमी झाले आहेत. ज्यामुळे सर्वसामान्यांवरील ईएमआयचा बोजा हलका झालाय.

देशातील प्रमुख बँका ७.१० टक्क्यांच्या सुरुवातीच्या व्याजदरानं होम लोन देत असून भारतीय स्टेट बँक देखील ७.२५ टक्क्यांच्या आकर्षक दरानं कर्ज उपलब्ध करून देत आहे.

जर तुम्ही एसबीआयकडून ७.२५ टक्के व्याजदराने ३० वर्षांसाठी ७५ लाख रुपयांचे होम लोन घेतलं, तर तुमचा मासिक पगार साधारणपणे १,००,००० रुपये असणे आवश्यक आहे. या गणनेनुसार तुमच्या नावावर इतर कोणतेही कर्ज सक्रिय नसावं, कारण गृहकर्जाच्या बाबतीत तुमच्या पगाराचा साधारण अर्धा हिस्सा म्हणजेच ५०,००० रुपये ईएमआयमध्ये खर्च होतो.

'पैसा बाजार'च्या ताज्या अहवालानुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडिया सर्वात कमी ७.१० टक्के दराने कर्ज देत आहे, तर कॅनरा बँक ७.१५ टक्के, पंजाब नॅशनल बँक ७.२० टक्के आणि पंजाब अँड सिंध बँक ७.३० टक्के दराने होम लोन देत आहेत.

ज्या ग्राहकांचा क्रेडिट स्कोर उत्तम आहे त्यांना व्याजदरात अधिक सवलत मिळू शकते. मात्र खराब क्रेडिट स्कोर असल्यास बँक कर्जाचा अर्ज नाकारू शकते.