घरबसल्या अशाप्रकारे चेक करा तुमचा PF बॅलन्स; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 11:35 AM2021-02-22T11:35:38+5:302021-02-22T11:42:47+5:30

Provident Fund Balance Check : सरकारनं व्याजाचीही रक्कम जमा करण्यास सुरूवात केली आहे. या स्टेप्स फॉलो करून पाहा तुमच्या पीएफ खात्यात किती जमा झाली आहे रक्कम.

जर तुम्हाला घरबसल्या तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम जाणून घ्यायची असेल तर यासाठी चार सोप्या पद्धती तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. यासाठी अर्ज करण्याची किंवा कार्यालयातही जाण्याची गरज नाही. पीएफची रक्कम ही तुमच्या कमाईचा एक मोठा हिस्सा असतो.

दरम्यान, अनेकदा आपल्याला आपल्या पीएफ खात्यात किती रक्कम जमा झाली किंवा त्यावर किती व्याज मिळालं याची माहिती नसते. तर तुम्ही ही रक्कम चार प्रकारे पाहू शकता.

एका मिस्ड कॉलवर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्याची संपूर्ण माहिती मिळू शकते. EPFO नं 011-22901406 हा नंबर जारी केला आहे. या नंबरवर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड नंबरवरून मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाऊंटची माहिती मिळेल.

SMS द्वारेही ग्राहकांना त्यांच्या पीएफ बॅलन्सची माहिती मिळू शकेल. यासाठीदेखील EPFO नं एक क्रमांक जारी केला आहे. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून 7738299899 या क्रमांकावर तुम्हाला एसएमएस पाठवावा लागले. त्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्याविषयी माहिती मिळेल.

एसएमएस पाठवण्याची पद्धत सोपी आहे. यासाठी तुम्हाला EPFOHO UAN असं लिहून 7738299899 या क्रमांकावर मेसेज करावा लागेल. ही सुविधा १० भाषांमध्ये उपलब्ध आहे.

जर तुम्ही हा मेसेज इंग्रजी मध्ये वाचू इच्छिता तर यासाठी तुम्हाला EPFOHO UAN ENG असं टाईप करावं लागेल. जर तुम्हाला मराठीत हा मेसेज वाचायचा असेल तर तुम्हाला EPFOHO UAN MAR असं टाईप करावं लागेल. यानंतर तुम्हाला तुम्ही सांगितलेल्या मेसेज संदेश प्राप्त होईल.

याव्यतिरिक्त तुम्ही EPFO च्या वेबसाईटवर जाऊन लॉगइन करूनही माहिती घेऊ शकता. यासाठी तुम्हाला UAN च्या मदतीनं https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login या ठिकाणी भेट द्यावी लागेल.

याव्यतिरिक्त तुम्ही आपल्या मोबाईल अकाऊंटमध्ये उमंग हे अॅप डाऊनलोड करून त्यात असलेल्या EPFO या सेक्शनमध्ये जाऊनही जमा झालेली रक्कम पाहू शकता.

ज्याचं पीएफ खातं अॅक्टिव्ह असेल त्याला फोन कॉल किंवा मेसेजद्वारेही माहिती मिळेल.

नुकताच सन २०१९-२० या वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीवर जाहीर केलेला व्याजाचा मोबदला पीएफ सभसदांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांना आपल्या खात्यात व्याज जमा झाले की नाही, याबाबत साशंकता असते. याबाबतही याद्वारे माहिती घेता येऊ शकते.

सन २०१९-२० या वर्षासाठी पीएफवर ८.५ टक्के व्याजदर मंजूर करण्यात आला आहे. श्रम मंत्रालयाने पीएफ व्याज रक्कम सभासदांना देण्यात यावी, असा प्रस्ताव अर्थ खात्याकडे पाठवला होता. या प्रस्तावाला अर्थ खात्याने मंजुरी दिली असून, व्याजाची रक्कम पीएफ सभासदांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे.

सप्टेंबरमध्ये व्याजाची रक्कम दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामधील पहिला टप्प्यात ८.१५ टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात ०.३५ टक्के व्याज देण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते.

मात्र, श्रम मंत्रालयाने एकाच वेळी संपूर्ण ८.५ टक्के व्याजाची रक्कम सभासदांना देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यावर अर्थ खात्याने सहमती दर्शवली. यानंतर आता संपूर्ण ८.५ टक्के व्याजाची रक्कम पीएफ सभासदांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे.

आपल्या पीएफ खात्यात पीएफ जमा झाला आहे की नाही याची खातरजमा पीएफ सभासदांना चार वेगवेगळ्या पर्यायांमधून करता येणार आहे. यात Umang App या सरकारी अॅपमधून पीएफ सभासदांना पीएफ व्याजबाबत माहिती घेता येईल.

Umang App मधून 'पीएफ' रक्कम तपासता येईल. स्मार्टफोनमध्ये प्ले स्टोअरमधून Umang App डाउनलोड करावे. या अॅपवर तुमचा मोबाइल क्रमांक रजिस्टर करा आणि अॅपमध्ये लॉगिन करा. अॅपमध्ये डाव्या बाजूला असलेल्या मेन्यूमध्ये ‘Service Directory’ मध्ये जा. यामध्ये मध्ये EPFO या पर्यायाची निवड करा. यात View Passbook यावर क्लिक करून त्यात UAN नंबर आणि OTP सादर करून 'पीएफ'ची शिल्लक जाणून घेता येऊ शकेल.

Read in English