Home Loan Tips: स्मार्ट व्हा आणि गृहकर्जाचे हप्ते करा कमी; व्याजातही पैसे वाचतील, ही ट्रिक वापरा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 16:06 IST2022-12-14T12:42:53+5:302022-12-21T16:06:12+5:30
घर घेण्यासाठी अनेकांसमोर गृहकर्जाशिवाय पर्याय नसतो; पण गृहकर्जाचा हप्ताही मोठा आणि दीर्घकालीन असतो. त्यातून पैसे कसे वाचवाल...

घर घेण्यासाठी अनेकांसमोर गृहकर्जाशिवाय पर्याय नसतो; पण गृहकर्जाचा हप्ताही मोठा आणि दीर्घकालीन असतो. त्यात मुद्दल व व्याज याचे मिश्रण असते. साधारणत: जेवढी मुद्दल असते, तेवढेच व्याज भरावे लागते. मात्र, त्यात निश्चितच बचत करणे शक्य आहे. हा बचतीचा मार्ग आहे प्री-पेमेंटचा. त्यातून गृहकर्जाचे हप्ते तुम्ही कमी करू शकता.
प्रारंभीपासूनच पर्याय उपलब्ध
गृहकर्ज घेतानाच प्री-पेमेंटचा पर्याय उपलब्ध असतो. प्री-पेमेंटचा योग्य कालावधी कोणता, हे जाणून घेणे यात आवश्यक आहे. गुंतवणूक सल्लागारांच्या मते बँका सुरुवातीच्या काळात व्याज वसूल करतात. त्यामुळे ईएमआयचे ओझे हलके करण्यासाठी सुरुवातीच्या काळापासूनच प्री-पेमेंट करणे आवश्यक आहे.
काय आहे प्री-पेमेंट ?
नियमित मासिक हप्त्यापेक्षा जास्त रक्कम स्वेच्छेने भरल्यास त्यास प्री-पेमेंट असे म्हटले जाते. ही अधिकची रक्कम थेट मुद्दलात जमा होते. त्यामुळे मुद्दल कमी होऊन व्याजाची रक्कम घटत जाते. त्यामुळे तुमचे कर्जाचे हप्ते लवकर संपतात. यामुळे कर्जदाराची बचत हाेते.
प्री-पेमेंटचा लेखाजोखा
समजा तुम्ही ७.५० टक्के व्याजदराने २० लाख रुपयांचे कर्ज २० वर्षांसाठी म्हणजेच २४० महिन्यांसाठी घेतले आहे. तर स्थिती अशी राहील.
तुम्ही संपूर्ण मुदतीपर्यंत हप्ते फेडणार असाल, तर तुम्हाला मासिक हप्ता १६,११२ रुपये येईल. एकूण ३८,६६,८४७ रुपये तुम्हाला भरावे लागतील. त्यात व्याज १८,६६,८४७ रुपये असेल.
समजा १६,११२ रुपयांच्या मासिक हप्त्यासोबतच १ हजार रुपये दरमहा प्री-पेमेंट केले तर तुमचे २.७० लाख रुपयांची बचत होईल. २४० मासिक हप्त्यातून २९ मासिक हप्ते कमी होतील.
व्याजात जाते मोठी रक्कम
गृहकर्जाच्या व्याजात मोठी रक्कम जाते. त्यातही पहिल्या ५ वर्षांमध्ये व्याज सर्वाधिक असते. नियमितपणे कर्ज फेडल्यास पुढीलप्रमाणे घट होते. सुरुवातीची ५ वर्षे ७.७%, त्यापुढील ५ वर्षे १९.२%, तिसऱ्या ५ वर्षे ३६.४%, चौथ्या ५ वर्षे ६९%, शेवटची ५ वर्षे संपूर्ण कर्ज फिटलेले