Adani Group:'राष्ट्रवादाचा बुरखा धारण करून...; हिंडेनबर्ग रिसर्चने पुन्हा अदानी समुहावर केले आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 11:48 AM2023-01-30T11:48:50+5:302023-01-31T12:22:18+5:30

गेल्या दोन दिवसापूर्वी अदानी समुहा संदर्भात अमेरिकेतील हिंडनबर्ग या संस्थेने आरोप केले. यानंतर भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला, अदानी समुहाला मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे.

गेल्या दोन दिवसापूर्वी अदानी समुहा संदर्भात अमेरिकेतील हिंडनबर्ग या संस्थेने आरोप केले. यानंतर भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला, अदानी समुहाला मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे. हिंडनबर्गच्या अहवालामुळे अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले.

आज अदानी समुहाने हिंडनबर्ग संस्थेला ४१३ पानांचे स्पष्टीकरण दिले आहे. यानंतर यावर हिंडनबर्गने आपली प्रतिक्रिया देत अदानी समुहावर पुन्हा आरोप केले आहेत. भारत एक दोलायमान लोकशाही आणि उदयोन्मुख महासत्ता आहे, अदानी समूह लूट करून भारताचे भविष्य रोखत आहे, असा आरोप हिंडनबर्ग रिसर्चने केला आहे.

अदानी समुहाने हिंडनबर्ग रिसर्चवर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. राष्ट्रवादाने फसवणूक थांबवता येत नाही. जे आपल्यावर केलेल्या प्रत्येक मोठ्या आरोपाकडे दुर्लक्ष करते. अदानी समूहाने "मुख्य मुद्द्यांवरून लक्ष हटविण्याचा आणि त्याऐवजी राष्ट्रवादी कथेला चालना देण्याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला", असंही हिडेनबर्गने म्हटले आहे.

'अदानी समूहाने त्यांचे अध्यक्ष गौतम अदानी यांची संपत्ती भारताच्या यशाशी जोडण्याचा प्रयत्न केला. आम्ही असहमत आहोत हे स्पष्ट करण्यासाठी, आमचा विश्वास आहे की भारतात एक जीवंत लोकशाही आहे आणि एक रोमांचक भविष्यासह एक उदयोन्मुख महासत्ता आहे. देशाची पद्धतशीरपणे लूट करताना स्वतःला भारतीय ध्वजात गुंडाळलेल्या अदानी समूहामुळे भारताचे भवितव्य रखडले आहे, असेही हिंडनबर्ग रिसर्चने म्हटले आहे.

'ही फसवणूक आहे, जरी ती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एका महान व्यक्तीने केली असेल. 'अदानी समूहाच्या स्टॉक मॅनिपुलेशन आणि अकाउंटिंग फसवणूक योजनेमुळे दलाल स्ट्रीटमध्ये गोंधळ झाला आहे.कारण पोर्ट-टू-एनर्जी समूहाचे बाजार मूल्य सुमारे 50 अब्ज डॉलर गमावले आहे. 413 पानांच्या उत्तरात, अदानी समूहाने म्हटले आहे की हा अहवाल "खोट्या बाजार निर्मिती" च्या "उद्दीष्ट हेतूने" प्रेरित आहे जेणेकरून यूएस फर्मला आर्थिक लाभ मिळू शकेल, असा दावाही हिंडनबर्ग रिसर्चने केला आहे.

देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँकेने मात्र आपण दिलेले कर्ज हे मर्यादेच्या आत असून काळजीचे कारण नसल्याचे म्हटले आहे. अदानी समूहाबाबत विपरित अहवाल असताना एलआयसी, स्टेट बँक यांनी कर्जपुरवठा सुरू ठेवल्याबाबत काँग्रेससह विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत स्टेट बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार अदानी समूहाला दिलेले कर्ज हे रिझव्‍‌र्ह बँकेने आखून दिलेल्या ‘लार्ज एक्सपोजर फ्रेमवर्क’च्या मर्यादेत असून त्यामुळे दिलेल्या कर्जाला कोणताही धोका नाही. आमच्या कर्जाना धोका उत्पन्न होऊ शकेल अशा घटनांचा आढावा घेण्याची आमची पद्धत आहे. त्यामुळे या प्रकरणाकडेही आमचे लक्ष आहे, असेही स्टेट बँकेने स्पष्ट केले आहे.

स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक स्वामिनाथन जे यांनी सांगितले की, बँकेकडून मोठ्या कर्जाचा नियमितपणे आढावा घेतला जातो. सद्यस्थितीत काळजीचे कोणतेही कारण दिसत नाही. अदानी समूहाची बहुतांश संपादने ही विदेशी कर्जे किंवा भांडवली बाजारातून झाली आहेत. त्यामुळे भारतीय बँकिंग व्यवस्थेला सध्या कोणतीही बाधा असल्याचे दिसत नाही.

दुसरीकडे, हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाबाबत दिलेला अहवाल हा भारत आणि भारतीय संस्थांवर केलेला पूर्वनियोजित हल्ला असून अहवालातील माहिती धांदात खोटी आहे, असा आरोप अदानी समूहाने केला आहे. अदानी समूहाने ४१३ पानांचे स्पष्टीकरण जारी केले. संस्थेने आर्थिक लाभ मिळवण्याच्या हेतूने हा अहवाल तयार केल्याचा दावा अदानी समूहाकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, हा केवळ एखाद्या विशिष्ट कंपनीवर करण्यात आलेला अवास्तव हल्ला नाही. तर भारत आणि भारतातील संस्थानांचे स्वातंत्र्य, अखंडता, गुणवत्ता तसेच भारताच्या विकासाची गाथा आणि देशाच्या महत्त्वाकांक्षेवर नियोजित हल्ला आहे, असा आरोप अदानी समूहाने केला आहे.