शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

UPI पेमेंट करणाऱ्यांनी लक्षा ठेवाव्यात या ५ स्टेप्स, कधीही होणार नाही फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 5:21 PM

1 / 6
यूपीआयद्वारे पेमेंट्स करण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यूपीआय पेमेंट्समुळे व्यवहार खूप सोपे झाले असले तरी या माध्यमातून फसवणूक होण्याचीही भीती असते. त्यामुळे यूपीआय पेमेंट्स करताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.
2 / 6
कधी-कधी बक्षीस मिळवण्यासाठी तुम्ही कुठल्यातरी अनोळखी मोबाईल नंबरवर पैसे ट्रान्सफर केले जातात. असं करणं टाळलं पाहिजे. तसेच संबंधित वेबसाईटची विश्वसनियता असल्यासच पेमेंट केलं पाहिजे.
3 / 6
तुमचा मोबाईल फोन नेहमी लॉक ठेवा. कुठल्याही परिस्थितीत अनोळखी लोकांना फोन देऊ नका. फ्रॉड लोक सरकारी किंवा बँक अधिकारी असल्याचे सांगत तुमची वैयक्तिक माहिती मागू शकतात. कुठलाही खरा अधिकारी अशी माहिती मागत नाही हे लक्षात ठेवा.
4 / 6
मोबाईल अॅपचा वापर करून तुम्ही डेली यूपीआय ट्रान्झॅक्शनची लिमिट निश्चित केल्यास ते फायदेशीर ठरू शकते. असं केल्याने फ्रॉड लोक तुमच्या खात्यातून सर्व पैसे काढू शकणार नाहीत. तसेच पैसेही सुरक्षित राहतील.
5 / 6
तुम्ही तुमची यूपीआय पिन नियमितपणे बदलत जा. दर तीन महिन्यांमधून किमान एकदा तुमची यूपीआय पिन बदला.
6 / 6
तसेच तुमची यूपीआय पिन कुणासोबतही शेअर करू नका. तसेच बँक खात्याबाबत माहिती मागणाऱ्या टेलिफोन कॉलबाबत सावधगिरी बाळगा. विशेषकरून त्या लोकांपासून जे सरकारी किंवा बँक अधिकारी असल्याचा दावा करतात.
टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रcyber crimeसायबर क्राइमMONEYपैसा