BSNL चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन; ४९ रूपयांत फ्री कॉलिंग, डेटा आणि अन्य बेनफिट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 04:53 PM2022-09-03T16:53:48+5:302022-09-03T16:58:01+5:30

BSNL Prepaid Plan: सरकारी दूरसंचार कंपनी BSNL सध्या असे काही प्लॅन्स ऑफर करत आहे जे अन्य दूरसंचार कंपन्यांकडे मिळणं कठीण आहे.

BSNL Prepaid Plan: सध्या सर्वच दूरसंचार कंपन्यांमध्ये नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि आपल्याकडील ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. सध्या अनेक दूरसंचार कंपन्या नवे आणि आकर्षित प्लॅन्सही लाँच करत आहेत. अशातच सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलही यात मागे नाही.

जर तुम्ही ५० आणि ६० रूपयांच्या दरम्यान प्रीपेड प्लॅन्सच्या शोधात असाल, तर तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. सरकारी कंपनी बीएसएनएलच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक परवडणारे प्लॅन्स आहेत. कंपनीनं असे अनेक प्लॅन्स आणले आहेत, ज्यांची किंमत खूप कमी आहे आणि त्यात अनेक बेनिफिट्सही मिळतात. कमी खर्च करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी प्रामुख्यानं हे प्लॅन्स तयार करण्यात आले आहेत.

बीएसएनएल सध्या आपल्या ग्राहकांसाठी ४९ रूपयांचा प्लॅन ऑफर करत आहे. हा नवा प्लॅन नाही. किंमत जरी कमी असली तरी यात डेटा आणि कॉलिंगची सुविधा देण्यात येते. या प्लॅनमध्ये एकूण १ जीबी डेटा ऑफर केला जातो.

या प्लॅनसोबत ग्राहकांना २० दिवसांची वैधता मिळता. तसंच वॉईस कॉलिंगचीही सुविधा या प्लॅनसोबत देण्यात येते. व्हॉईस कॉलिंगसाठी यात १०० मिनिट्स देण्यात येतात. परंतु यात अन्य कोणतेही वॉईस कॉलिंग किंवा मोफत एसएमएस देण्यात येत नाही.

ज्या लोकांना कमी डेटा आणि कमी कॉलिंगची गरज आहे, अशा लोकांना हा प्लॅन फायद्याचा ठरू शकतो. या प्लॅनद्वारे कमी खर्चात तुम्ही आपलं सिमकार्ड अॅक्टिव्ह ठेवू शकता. यापूर्वी एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्याही ४९ रूपयांचा प्लॅन ऑफर करत होते. परंतु सध्या तो उपलब्ध नाही.

जर तुम्हाला यापेक्षाही कमी किंमतीचा प्लॅन हवा असेल तर तुमच्यासाठी कंपनी २९ रूपयांचा प्लॅनही ऑफर करत आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह १ जीबी डेटा ऑफर केला जातो. परंतु या प्लॅनची वैधता पाच दिवसांची आहे.