कर वाचेल, रिटर्नही मिळेल! सरकारी योजनांचा 'डबल धमाका'; जाणून घ्या याबद्दल...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 02:38 PM2024-01-10T14:38:16+5:302024-01-10T14:45:27+5:30

सुरुवातीलाच योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास आयकर कपातही कमी होईल तसेच परतावादेखील चांगला मिळेल

Tax Saving Governement Schemes: कंपन्यांनी वर्षासाठी आयकर कपातीला सुरुवात केली आहे. आर्थिक वर्ष सुरू होताच गुंतवणुकीचे नियोजन करणे आवश्यक आहे. अन्यथा वर्षाच्या शेवटी मोठी कपात होते. सुरुवातीलाच योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास आयकर कपातही कमी होईल तसेच परतावादेखील चांगला मिळेल. दुहेरी लाभ देणाऱ्या अशा काही योजनांबाबत जाणून घेऊया.

ही म्युच्युअल फंडप्रमाणे गुंतवणुकीची योजना आहे. या योजनेतील गुंतवणूक किमान ३ वर्षांपर्यंत काढता येत नाही. १.५ लाख रुपयांपर्यंतच्या कर वजावटीचा लाभ आणि चांगला परतावा, असा दुहेरी लाभ मिळतो. ही गुंतवणूक काही जोखिमींना धरून असते. त्याची माहिती घेऊनच पैसे गुंतवावे.

पब्लिक प्रॉव्हिडंड फंड म्हणजेच पीपीएफ. या योजनेत गुंतवणूक सुरक्षित राहते. परताव्याची हमी आहे. ही एक दीर्घकालीन गुंतवणुकीची योजना आहे. गुंतवणूक १५ वर्षांनी परिपक्व होते. १.५ लाख रुपयांपर्यंतची आयकर वजावट कलम ८०सी अंतर्गत मिळते. गुंतवणूक, व्याज आणि परिपक्वतेनंतर मिळणारी रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे.

मुलीचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना लाभदायक ठरू शकते.  मुलीच्या नावे किमान २५० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. गुंतवणुकीवर १.५ लाख रुपयांपर्यंतच्या आयकर वजावटीचा लाभ घेता येतो.

करबचतीसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना अर्थात एनपीएस हा एक अतिरिक्त पर्याय आहे. कलम ८०सी अंतर्गत मिळणाऱ्या १.५ लाख रुपयांच्या वजावटीव्यतिरिक्त ५० हजार रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त वजावटीचा लाभ घेता येतो.

ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक बचत योजना आहे. १ हजार रुपयांपासून ३० लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक ज्येष्ठ नागरिक करू शकतात. याशिवाय आयकर कपातीच्या कक्षेत येणाऱ्या ज्येष्ठांना वजावटीचाही लाभ मिळतो. ८.२% दराने या योजनेतील जमा रकमेवर व्याज मिळत आहे.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही एक जुनी योजना आहे. यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. हमखास परतावाही मिळतो. किमान १ हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येते. कमाल मर्यादा नाही. १.५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर वजावटीचा लाभ मिळतो. ७.७% दराने या योजनेत व्याज मिळत आहे.