शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 19:08 IST2025-09-22T19:01:57+5:302025-09-22T19:08:58+5:30

महत्वाचे म्हणजे, कंपनीच्या या निर्णयामुळे बाजारात स्पर्धा वाढणार..!

भारतीय टायर निर्माता कंपनी एमआरएफ (MRF) च्या शेअर्समध्ये आज (सोमवारी) जोरदार तेजी बघायला मिळाली. हा शेअर आज 4115 रुपयांनी (2.7%) वाढून थेट 154,055 रुपयांच्या इंट्रा-डे हायवर पोहोचला आहे.

ही तेजी, सरकारने टायरांवरील जीएसटी दरांमध्ये केल्याल्या कपातीमुळे आल्याचे बोलले जात आहे. जी आज 22 सप्टेंबरपासून लागू झाली आहे.

GST कपातीमुळे शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण - सरकारने केलेल्या जीएसटी कपातीमुळे आता ग्राहकांना टायर कमी किंमतीत मिलू शकेल. याचा थेट फायदा ग्राहकांना अथवा वाहनधारकांना होईल. यामुळे वाहनाचा देखभाल खर्चही कमी होईल.

महत्वाचे म्हणजे, कंपनीच्या या निर्णयामुळे बाजारात स्पर्धा वाढेल आणि इतर टायर उत्पादक देखील किंमती कमी करण्यास अथवा ऑफर्स देण्यास प्रवृत्त होतील. अशा प्रकारे GST कपात ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

जून तिमाहीत कमी झाला नफा - MRF कंपनीच्या नफ्यासंदर्भात बोलायचे झाल्यास, जून तिमाहीतील कंपनीचा शुद्ध नफा सुमारे 14% ने कमी होऊन ₹484 कोटींवर आला आहे. गेल्या वर्षात याच कालावधीत कंपनीचा नफा ₹563 कोटी एवढा होता.

नफ्यावर घट होण्यामागे मुख्य कारण रबरच्या किमतीतील वाढ आहे. कंपनीच्या संचालनातून मिळणारे उत्पन्न 6.8% ने वाढून ₹756 कोटी झाले, तर एकूण खर्च 9.8% ने वाढला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)