Google ने भारतात सुरू केले अधिकृत स्टोअर; Pixel फोन्सवर मिळतोय ₹42000 चा डिस्काउंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 14:18 IST2025-05-29T14:10:55+5:302025-05-29T14:18:19+5:30

Google Store Offer: भारतात गुगलचे स्टोअर सुरू झाल्यामुळे तुम्ही थेट कंपनीकडून Pixel डिव्हाइस खरेदी करू शकता.

Google Store Offer: गुगलचे फोन्स अथवा इतर प्रोडक्ट वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गुगलने भारतात आपले अधिकृत ऑनलाइन स्टोअर सुरू केले आहे. यामुळे तुम्ही कंपनीकडून थेट Pixel डिव्हाइस खरेदी करू शकता. आतापर्यंत कंपनी भारतात थेट गुगलची उत्पादने विकत नव्हती.

कंपनीने आपले उत्पादने विकण्यासाठी थर्ड पार्टी विक्रेते नेमले होते. फ्लिपकार्ट अधिकृतपणे भारतात गुगलचे पिक्सेल फोन विकायचा. पण, आता भारतीय बाजारपेठेत आपली उपस्थिती वाढवण्यासाटी गुगलने आपले अधिकृत स्टोअर सुरू केले आहे. विशेष म्हणजे, अलीकडेच कंपनीने भारतात त्यांचे स्मार्टफोन्स तयार करण्यास सुरुवात केली आहे.

ग्राहक गुगल स्टोअरवरून स्मार्टफोन, TWS इअरबड्स आणि स्मार्टवॉच खरेदी करू शकतात. कंपनीच्या दाव्यानुसार, अधिकृत स्टोअरवरून ही उत्पादने खरेदी करण्यात खूप फायदा आहे.

ग्राहकांना केवळ प्रामाणिक उत्पादनेच मिळणार नाहीत, तर त्यांना विविध पेमेंट ऑप्शन्स आणि विशेष ऑफर देखील मिळतील. ग्राहकांना डिस्काउंट, गुगल स्टोअर क्रेडिट किंवा इन्स्टंट कॅशबॅक सारख्या ऑफर्सचा फायदा मिळेल. याशिवाय, तुम्ही तुमचे जुने डिव्हाइस एक्सचेंजही करू शकता. कंपनी EMI पर्याय देखील देत आहे.

कंपनी Pixel 9 वर 6 हजारांचा एक्सचेंज बोनस देत आहे. तर, Pixel 9 Pro वर 12 हजार रुपये आणि Pixel 9 Pro Fold वर 15 हजार रुपयांची सूट देत आहे. कंपनी आपल्या वेगवेगळ्या मॉडेल्सवर 15 हजार रुपयांपर्यंतची Google Store सूट देत आहे. यामध्ये त्वरित सवलतीसह बँक ऑफर्सचा समावेश आहे.

कंपनी Pixel 9a वर 3 हजारांचा कॅशबॅक देत आहे, त्यामुळे हा फोन तुम्हाला 46,999 रुपयांना मिळेल. तर, Pixel 9 वर 5 हजारांचा डिस्काउंट आणि 7 हजारांचा कॅशबॅकही उपलब्ध आहे.

Pixel 9 Pro XL वर स्टोअरमध्ये 10 हजारांचा डिस्काउंट आणि 10 हजार रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक मिळत आहे. याशिवाय, ही ऑफर Pixel 9 Pro Fold वर देखील उपलब्ध आहे.

याशिवाय, Pixel 8a वर स्टोअर डिस्काउंट 15 हजार आणि इन्स्टंट कॅशबॅक 3 हजार मिळत आहे. Pixel 8 Pro वर स्टोअर डिस्काउंट 37,000 आणि इन्स्टंट कॅशबॅक 7 हजार मिळत आहे. म्हणजेच, फोनवर 42 हजारांची सूट दिली जात आहे. डिस्काउंटनंतर, तुम्ही हा फोन 62,999 रुपयांना खरेदी करू शकता.