Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 10:39 IST2026-04-06T10:31:40+5:302026-04-06T10:39:13+5:30

Gold Silver Rate Today MCX: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, ६ एप्रिल २०२६ रोजी, सराफा बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर.

Gold Silver Rate Today MCX: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, ६ एप्रिल २०२६ रोजी, सराफा बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर सोन्याचा भाव १,४८,५६० रुपये प्रति दहा ग्रॅमवर उघडला, तर चांदीची किंमत २,३०,२०० रुपये प्रति किलोवर खुली झाली.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कमोडिटी मार्केटमधील या घसरणीचे मुख्य कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेले सततचे इशारे हे आहे. ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर जागतिक तणाव वाढत चालला आहे.

गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, म्हणजेच गुरुवारी २ एप्रिल रोजी, एमसीएक्सवर सोन्याचा भाव १,४९,६५० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी २,३२,६०० रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. ३ एप्रिल रोजी 'गुड फ्रायडे' निमित्त बाजार बंद असल्याने आज थेट व्यवहार होत आहेत.

मागील बंद भावाच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत १,०९० रुपये प्रति १० ग्रॅमची घट नोंदवण्यात आली आहे, तर चांदीच्या किमतीत २,४०० रुपये प्रति किलोची घसरण झाली आहे. विशेष म्हणजे, आपल्या ऐतिहासिक उच्चांकावरून सोनं आता ३१,४४० रुपये आणि चांदी १,८९,८०० रुपयांनी खाली आली.

राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५१,०७० रुपये, २२ कॅरेटसाठी १,३८,४९० रुपये आणि १८ कॅरेटसाठी १,१३,३४० रुपये झाला आहे. तर दुसरीकडे आर्थिक राजधानी मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर १,५०,९२० रुपये, २२ कॅरेटसाठी १,३८,३४० रुपये आणि १८ कॅरेटसाठी १,१३,१९० रुपये इतका नोंदवण्यात आला आहे.

चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५२,१७० रुपये, २२ कॅरेटसाठी १,३९,४९० रुपये आणि १८ कॅरेटसाठी १,१६,३४० रुपये झाला आहे. तर कोलकात्यात आज २४ कॅरेट सोन्याची किंमत १,४९,१३० रुपये, २२ कॅरेटसाठी १,३६,७०० रुपये आणि १८ कॅरेटसाठी १,१८,५०० रुपये झाली आहे.

बिहारची राजधानी पटनामध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १,५०,९७० रुपये, २२ कॅरेटसाठी १,३८,३९० रुपये आणि १८ कॅरेटसाठी १,१३,२४० रुपये आहे. सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही आज मोठी घसरण पाहायला मिळत आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि पटना या शहरांमध्ये आज १ किलो चांदीची किंमत २,५०,००० रुपये झाली आहे. तर चेन्नईमध्ये चांदीचा भाव २,५४,९०० रुपये प्रति किलो इतका आहे.