शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण; उच्चांकापासून १,९२,००० नं घसरली चांदी; चेक करा दिल्ली, मुंबई, चेन्नईचे लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 10:32 IST

1 / 7
Gold Silver Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवार ३० मार्च रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. आज सोन्याची किंमत १,४६,४७१ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,२७,०५० रुपये प्रति किलो झाला आहे. विशेष म्हणजे, सोने आणि चांदीचे दर त्यांच्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून बरेच खाली आले आहेत.
2 / 7
शुक्रवार २७ मार्च रोजी बाजार बंद होताना सोन्याचा भाव १,४७,२७० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,२७,७५० रुपये प्रति किलो होता. शुक्रवारच्या तुलनेत आज सोन्याच्या किमतीत ७९९ रुपयांची (प्रति १० ग्रॅम) आणि चांदीच्या किमतीत ७०० रुपयांची (प्रति किलो) घसरण नोंदवण्यात आली आहे.
3 / 7
सोन्या-चांदीच्या किमतींनी २९ जानेवारी २०२६ रोजी आपला ऑल टाइम हाय रेकॉर्ड बनवला होता. तेव्हा सोन्याचा भाव एमसीएक्सवर १,८०,००० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव ४,२०,००० रुपये प्रति किलो होता. आपल्या ऑल टाइम हाय रेकॉर्डपासून चांदीची किंमत १,९२,९५० रुपये प्रति किलोनं खाली आली आहे.
4 / 7
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत १,४८,०८० रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोन्याचा भाव १,३५,७४० रुपये प्रति १० ग्रॅम आणि १८ कॅरेट गोल्ड रेट १,११,०६० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहेत. मुंबईत चांदीची किंमत २,४४,९०० रुपये प्रति किलो झालीये.
5 / 7
दिल्ली - दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४८,२१० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. याशिवाय २२ कॅरेट सोन्याची किंमत १,३५,८९० रुपये प्रति १० ग्रॅम आणि १८ कॅरेटची किंमत १,११,२१० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. चांदीची किंमत २,४४,९०० रुपये प्रति किलो झाली आहे.
6 / 7
चेन्नई - चेन्नईमध्ये आज २४ कॅरेट सोन्याची किंमत १,४९,०१० रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट गोल्ड रेट १,३६,५९० रुपये प्रति १० ग्रॅम आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव १,१३,९९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. एक किलो चांदीची किंमत २,४९,९०० रुपये झाली आहे.
7 / 7
कोलकाता - कोलकातामध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४८,०८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत १,३५,७४० रुपये प्रति १० ग्रॅम आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव १,११,०६० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. एक किलो चांदीची किंमत २,४४,९०० रुपये झाली आहे.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीInvestmentगुंतवणूकMONEYपैसा