Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दरात झाली घसरण, फटाफट चेक करा आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 02:25 PM2023-07-06T14:25:25+5:302023-07-06T14:30:06+5:30

Gold Price Today: सोन्याचे दर पुन्हा एकदा घसरले आहेत. दुसरीकडे चांदीने 70,000 चा टप्पा पार केला आहे.

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांत 68,000 रुपयांपर्यंत घसरलेल्या चांदीने पुन्हा एकदा 70,000 रुपये प्रति किलोचा टप्पा पार केला आहे.

सोन्याचा भावही 58000 रुपयांच्या आसपास आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला विक्रमी उच्चांक गाठलेल्या सोन्यात आता नरमता दिसून येत आहे.

चांदीमध्ये थोडी तेजी असली तरी. मे महिन्यात सोन्याने 61739 रुपये आणि चांदी 77280 रुपये प्रति किलो असा विक्रमी पातळी गाठली.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, दोन्ही मौल्यवान धातूंचे दर गुरुवारी वाढताना दिसत आहेत. मात्र, सराफा बाजारात सोन्याच्या दरात घट झाली असली तरी चांदीमध्ये मात्र वाढ झाली आहे.

Gold Price Today: सोने 60,000 रुपयांच्या खाली आहे. दुसरीकडे चांदीने 70,000 चा टप्पा पार केला आहे. दिवाळीच्या काळात सोन्या-चांदीचे दर पुन्हा वाढू शकतात.

Gold Price Today: गुरुवारी, मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली. MCX वर गुरुवारी सोन्याचा भाव 28 रुपयांनी वाढून 58501 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

Gold Price Today: चांदी 109 रुपयांनी वाढून 71466 रुपये प्रति किलोवर पोहोचली. याआधी बुधवारी एमसीएक्सवर सोने 58473 रुपये आणि चांदी 71357 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

Gold Price Today: https://ibjarates.com या वेबसाइट सोन्या-चांदीचे दर दररोज अपडेट केले जातात. गुरुवारी सोन्यामध्ये घसरण आणि चांदीच्या दरात वाढ झाली.

Gold Price Today: सराफा बाजारात सोन्याचा भाव 75 रुपयांनी घसरून 58557 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचवेळी चांदीचा भाव 1100 रुपयांनी वाढून 70800 रुपये किलोवर पोहोचला. याआधी बुधवारी सोन्याचा भाव 58631 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 69699 रुपयांवर बंद झाला होता.