शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Rate Today: खूशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवे दर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 4:47 PM

1 / 8
जागतिक बाजारपेठेत किंमती घसरल्यामुळे गुरुवारी भारतीय बाजारपेठेत देखील सोनं आणि चांदीच्या किंमतीत लक्षणीयरित्या घट नोंदविण्यात आली आहे.
2 / 8
आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या किंमतीत तब्बल १.८९ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. म्हणजेच ९१६ रुपयांची घट झाली आहे.
3 / 8
एमसीएक्सवरील माहितीनुसार सोन्याचा लेटेस्ट दर प्रति १० ग्रॅमसाठी ४७ हजार ५९० रुपये इतका आहे.
4 / 8
दुसरीकडे चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. चांदीच्या दरात २.७५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. चांदीच्या किंमतीत आज तब्बल १ हजार ९६२ रुपयांची घट झाली आहे.
5 / 8
चांदीचा लेटेस्ट दर प्रति १ किलोसाठी ६९ हजार ५०६ रुपये इतका झाला आहे. यूएस फेडरल रिझर्वने दिलेल्या संकेतानुसार लवकरच अपेक्षेपेक्षा जास्त व्याज दर वाढवू शकतात. यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याच्या किंमतीत अडीच टक्क्यांहून अधिक टक्के घट झाली.
6 / 8
गेल्या दोन महिन्यात डॉलरची किंमत ही उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. तर गेल्या दहा वर्षात यूएस ट्रेझरीच्या उत्पादनात वाढ झाली. त्यामुळे याचा सोनं आणि चांदीच्या किमतीवरही परिणाम होत आहे.
7 / 8
गुडरिटर्न्स वेबसाइटच्या माहितीनुसार मुंबईत आज सोन्याच्या दरात घसरण होऊन प्रति १० ग्रॅमसाठी सोन्याचा दर ४७ हजार ३५० रुपये इतका आहे. तर दिल्लीच्या सराफा बाराजात ४७ हजार रुपये दर आहे.
8 / 8
मुंबईत चांदीचा भाव १ किलोसाठी ७० हजार ३०० रुपये इतका आहे. तर विशाखापट्टणममध्ये हाच दर सर्वाधिक ७५ हजार १०० रुपये इतका आहे.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीshare marketशेअर बाजार