Gold Price : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ! तपासा तुमच्या शहरातील दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 13:19 IST2024-07-06T13:00:23+5:302024-07-06T13:19:14+5:30

Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात आता पुन्हा एकदा बदल झाला आहे. गेल्या काही दिवसापासून कमी होत असलेले दर आता पुन्हा एकदा वाढले आहेत.

गेल्या काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली होती. पण आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव १.१ टक्क्यांनी वाढून २,३८१ डॉलर प्रति औंस झाला. या आठवड्यात फक्त सोन्याच्या किमती २ टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत.

येणाऱ्या काळात सोन्याचे भाव वाढणार असल्याचे चित्र आहे. संपूर्ण आठवडाभरात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे वायदे २ टक्क्यांहून अधिक वाढले आणि प्रति औंस २,३९० डॉलरवर पोहोचले.

देशांतर्गत बाजारातही सोन्याचे दर वाढले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर शुक्रवारी फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये सोने ०.९३ टक्क्यांनी महागून ७३,०३८ रुपये प्रति १० ग्रॅम झाले. हा दीड महिन्याचा उच्चांक आहे.

सोनं लवकरच उच्चांकी पातळी ओलांडण्याची शक्यता आहे, सोन्याची सर्वकालीन उच्च पातळी २,४५० डॉलर प्रति औंस आहे, ही या वर्षातच गाठली होती.

फेडरल रिझर्व्हनेही सोन्यासाठी सकारात्मक परिस्थिती तयार केली आहे. अमेरिकेची सेंट्रल बँक, फेडरल रिझर्व्ह सप्टेंबरमध्ये व्याजदरात कपात करु शकतात.यामुळे सोन्या चांदीचे दर वाढू शकतात.

विश्लेषकांचे अंदाज खरे ठरले आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला, तर त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येईल. याचा अर्थ येत्या काळात सोने महाग होऊ शकते.