सोन्याच्या किमतीनं इतिहास रचला, भाव विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचला; चांदीही ₹1 लाख पार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 22:34 IST2025-02-20T22:18:20+5:302025-02-20T22:34:35+5:30
इंडियन इंटरनॅशनल बुलियन असोसिएशनने यासंदर्भात माहिती दिली आहे...

सोने आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ दिसून येत आहे. आज सोमवारी सोन्याचा दर विक्रमी उच्चांकावर पोहोचला. गुरुवारी, जागतिक पातळीवरील मजबूत ट्रेंड दरम्यान राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव ५० रुपयांनी वाढून ८९,४५० रुपये प्रति १० ग्रॅम, या नव्या उच्चांकावर जाऊन पोहोचला.
इंडियन इंटरनॅशनल बुलियन असोसिएशनने यासंदर्भात माहिती दिली आहे. बुधवारी ९९.९ टक्के शुद्धता असलेले सोने ८९,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले. तर ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव ५० रुपयांनी वाढून ८९,०५० रुपये प्रति १० ग्रॅम, या विक्रमी पातळीवर पोहोचला.
दरम्यान, चांदीचा भावही गत ९९,६०० रुपये प्रति किलो या बंद किमतीवरून ७०० रुपयांनी वाढून १००३०० रुपये प्रति किलो वर पोहोचला.
काय म्हणतात एक्सपर्ट - एचडीएफसी सिक्योरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (जिंस) सौमिल गांधी म्हणाले, ‘‘गुरुवारी सोन्याचा दर नव्या विक्रमी पातळीवर पोहोचला. कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरीफ नीती संदर्भातील बातम्यांमुळे गुंतवणूकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्या प्रति आकर्षण वाढले आहे.’’
आपण पुढील महिन्यात अथवा त्यापूर्वीच टिंबर, ऑटोमोबाईल्स, सेमीकंडक्टर आणि औषधांवर टॅरिफ लादणार, असे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी बुधवारी म्हटले होते.
गांधी पुढे म्हणाले, "ट्रम्प यांच्या धोरणामुळे जागतिक पातळीवर व्यापार युद्ध सुरू होऊ शकते, अशी भीती या बातमीमुळे बाजारात वाढवली आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या किमती वाढतील."