Gold rate today: सोनं-चांदीच्या दरात आज १३०० रुपयांची घसरण, जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 04:29 PM2021-06-02T16:29:14+5:302021-06-02T16:32:37+5:30

Gold Silver latest price: सोनं आणि चांदीच्या दरात आज घसरण नोंदविण्यात आली आहे. जाणून घेऊयात आजचे लेटेस्ट दर काय सांगतात...

सोनं आणि चांदी खरेदीदारांसाठी चांगली बातमी आहे. आज दोन्ही धातूंच्या किमतीत घट झालेली पाहायला मिळाली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचं दिसून आलं होतं. पण आज किंचितशी घट नोंदविण्यात आली आहे.

सोन्याच्या दरात आज ११६ रुपयांची तर चांदीच्या दरात आज १२९१ रुपयांची अशाप्रकारे दोन्ही धातूंची मिळून एकूण १३०० रुपयांची घट आज नोंदविण्यात आली आहे.

दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याचा दर ४८ हजार ७७२ रुपये इतका आहे. तर चांदीचा दर प्रतिकिलो ७० हजार ८३६ रुपये इतका नोंदविण्यात आला आहे.

मंगळवारी हाच दर सोन्यासाठी ४८ हजार ८८८ रुपये इतका होता. तर चांदीसाठी प्रतिकिलो ७२ हजार १२३ रुपए इतका होता.

आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. इन्वेस्टिंग डॉट कॉमच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार दुपारी ३ वाजून २१ मिनिटांनी सोनं ६.२० डॉलरच्या तुटीसह १,८९८.८० डॉलर प्रतिऔंसवर ट्रेंड करत होता. तर याचवेळी चांदीचा दर ०.२१५ डॉलरच्या तुटीसह २७.८८७ डॉलर प्रतिऔंसवर ट्रेंड करत होता.

दुसरीकडे MCX वरही सोन्याच्या दरात किंचित घट झाल्याचं पाहायला मिळालं. MCX वर दुपारी ३ वाजता सोन्याच्या दरात घट होऊन ४९ हजार ४२४ रुपयांवर ट्रेंड करत होता. तर ऑक्टोबरसाठीच्या दरात १२१ रुपयांची तेजी पाहायला मिळत होती.

MCX वर चांदीच्या दरातही घट झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीसाठी जुलैच्या दरात २९३ रुपयांच्या घसरणीसह प्रतिकिलो ७१ हजार ९५५ रुपयांवर ट्रेंड करत होतं.

त्याचपद्धतीनं सप्टेंबरसाठीच्या चांदीच्या दरात ५०५ रुपयांची घट दाखवत प्रतिकिलो ७२ हजार ९०८ रुपये ट्रेंड सुरू होता.