सोने महाग झालेय...! अवघ्या ५ ग्रॅममध्ये सोन्याची चेन बनविता येईल, बजेट वाढविण्यापेक्षा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 16:14 IST2026-02-11T15:59:55+5:302026-02-11T16:14:01+5:30

Gold Chain Designs 5 grams : सोन्याचे भाव वाढले असले तरी काळजी करू नका! संधी साधण्याची हीच तर खरी संधी आहे...

सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले असले तरी, दागिन्यांची क्रेझ मात्र कमी झालेली नाही. लग्नसराईचा हंगाम असो किंवा घरगुती कार्यक्रम, सोन्याची नाजूक चैन गळ्यात असणे सौंदर्यात भरच पाडते.

सोन्याची किंमत वाढल्याने आता ज्या किंमतीत तोळ्या दोन तोळ्याचा दागिना आला असता तिथे आता काही ग्रॅमवरच समाधान मानावे लागत आहे.

अशा वेळी १,२, ५ ग्रॅम सोन्यातील चैन डिझाइन्स चांगल्या ठरणार आहेत. ही चैन कशी असते, ते पाहतानाच अशा चैनी खरेदी करताना काही काळजी घ्यावी लागणार आहे.

लहान चैन केवळ वजनाला हलकी नसते, तर ती दिसायलाही अत्यंत मोहक आणि आधुनिक असते. सध्या बाजारात अशा कमी सोन्याचा वापर केलेल्या दागिन्यांचीच चलती आली आहे.

हॉलमार्क नक्की तपासा: सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी बीआयएस (BIS) हॉलमार्क असलेलेच दागिने खरेदी करा.

मजुरी खर्च : दागिन्यांचे डिझाईन जितके क्लिष्ट असेल, तितके मेकिंग चार्जेस जास्त असतात. हलक्या दागिन्यांवर मेकिंग चार्जेस कमी राहतील याची खात्री करा.

मजबुती: चैन वजनाला कमी असली तरी ती तुटणार नाही याची खात्री करून घ्या.

सोन्याचे दर महागल्याने आता काही ग्रॅममध्ये बनविलेले दागिनेच लोकांच्या खिशाला परवडणार आहेत. यामुळे छोट्या मोठ्या शहरांत नवीन बिझनेस सुरु करण्याची देखील संधी उपलब्ध होत आहे.

टॅग्स :सोनंGold