Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 10:27 IST2026-04-07T10:19:30+5:302026-04-07T10:27:39+5:30

Gold silver price on MCX, April 07: मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियावर ७ एप्रिल रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली. देशांतर्गत कमोडिटी मार्केटमध्ये सोने-चांदी स्वस्त झाल्यामुळे लग्नसराईचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळाला.

Gold silver price on MCX, April 07: मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर ७ एप्रिल २०२६, सोमवार रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली. देशांतर्गत कमोडिटी मार्केटमध्ये सोने-चांदी स्वस्त झाल्यामुळे लग्नसराईचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळाला. आज सोन्याचा भाव १,४९,९४० रुपये (प्रति १० ग्रॅम) आणि चांदीचा भाव २,३३,१५२ रुपये प्रति किलोग्रामवर आलाय.

सोमवारी एमसीएक्सवर सोन्याचा भाव १,५०,१०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,३३,३६७ रुपये प्रति किलोग्रामवर बंद झाला होता. कालच्या बंद भावाच्या तुलनेत आज सोने सुमारे १६० रुपयांनी आणि चांदी सुमारे २१५ रुपयांनी स्वस्त झाली.

आपल्या 'ऑल टाइम हाय' रेकॉर्डच्या तुलनेत सोन्याची किंमत सुमारे ३०,००० रुपयांनी आणि चांदीची किंमत १,८६,८४८ रुपयांनी कमी झाली आहे. सोने-चांदीच्या किमतीत येत असलेली ही घसरण कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेल्या वाढीचा परिणाम आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे कमोडिटी बाजार सध्या दबावाचा सामना करत आहे.

आज दिल्लीत २४ कॅरेट सोन्याची किंमत १,४९,९९० रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोन्याचा दर १,३७,५०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि १८ कॅरेटची किंमत १,१२,५३० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. चांदीची किंमत २,५०,००० रुपये प्रति किलोग्राम झाली.

मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत १,४९,८४० रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोन्याचा भाव १,३७,३५० रुपये प्रति १० ग्रॅम आणि १८ कॅरेट सोन्याचा दर १,१२,३८० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. चांदीची किंमत २,५०,००० रुपये प्रति किलोग्राम झालाय.

चेन्नईमध्ये आज २४ कॅरेट सोन्याची किंमत १,५२,६३० रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोन्याचा दर १,३९,९१० रुपये प्रति १० ग्रॅम आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव १,१६,७१० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. चांदीची किंमत २,६०,१०० रुपये प्रति किलोग्राम झालाय.

कोलकातामध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४९,८४० रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोन्याची किंमत १,३७,३५० रुपये प्रति १० ग्रॅम आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव १,१२,३८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. चांदीची किंमत २,५०,००० रुपये प्रति किलोग्राम आहे.