रिलायन्स जिओकडून युजर्संना भेट ?, एका वर्षासाठी 'ही' सेवा मोफत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 02:57 PM2020-06-05T14:57:59+5:302020-06-05T15:04:29+5:30

टेलिकम्युनिकेश क्षेत्रातील नामवंत कंपनी असलेली रिलायन्स जिओ आता ग्राहकांसाठी खास ऑफर घेऊन येत आहे. जिओची अधिकृत वेबसाईट असलेल्या जिओ डॉट. कॉमवर एक टीजर पोस्टर जारी करण्यात आलं आहे.

ज्यामध्ये, रिलायन्स जिओकडून १ वर्षासाठी युजर्संना Disney + Hotstar VIP चे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. रिलायन्सकडून पहिल्यांदाचा ग्राहकांशी ही ऑफर देण्यात येत आहे.

रिलायन्स जिओकडून ग्राहकांना ३९९ रुपयांच्या डिस्नी प्ल हॉटस्टारचं महिनाभराचं सबस्क्रिप्शन मोफत देण्यात येत आहे. यापूर्वीही जिओने आपल्या युजर्ससाठी प्रिमियम सबस्क्रीप्शन देण्यासाठी हॉटस्टारसोबत हातमिळवणी केली होती.

आता, मिळणाऱ्या डिस्नी हॉटस्टार सबस्क्रिप्शनमुळे युजर्संना डिस्नी शो, चित्रपट आणि लहान मुलांच्या कंटेट अॅक्सेससोबतच हॉटस्टार स्पेशल आणि लाईव्ह शोही मोफत पाहता येणार

दरम्यान, टिजर पोस्टरवरुन यांसदर्भात अधिकृत घोषणा किंवा माहिती देण्यात आली नाही, केवळ कमिंग सुन असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे. त्यामुळे, नेमकं कधी ही सेवा युजर्संना मिळणार आहे? यासोबतच सर्व जिओ युजर्संना ही सेवा मिळणार का? हाही प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे.

रिलायन्स जिओने आपल्या या ऑफरसह एअरटेलला टक्कर देण्याची तयारी केली आहे.

कारण, सध्या एअरटेल ४०१ च्या प्लॅनसोबत युजर्संना एका वर्षांच्या व्हॅलिटिडीसोबत डिस्नी प्लस हॉटस्टार सबस्क्रिप्शन मोफत देण्यात येत आहे.