Mukesh Ambani, Azim Premji, Gautam Adani Net Worth:आश्चर्य! हे वर्ष अदानींचे, पण विप्रोच्या दानशूर अझीम प्रेमजींनी मुकेश अंबानींपेक्षा जास्त कमावले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 02:33 PM2021-12-31T14:33:52+5:302021-12-31T14:41:18+5:30

Indias top most billionaire Mukesh Ambani, Azim Premji, Gautam Adani Net Worth: Bloomberg Billionaire index ने जगातील अब्जाधिशांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पहिल्या १० मध्ये एकही भारतीय नाही.

कमाईच्या बाबतीत सरते वर्ष अदानी ग्रुप (Adani Group) चे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांनी गाजविले आहे. यावर्षी त्यांच्या संपत्तीत ४१.५ अब्ज डॉलर्सची वाढ झाली. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही अशीही एक घटना घडली आहे. विप्रोचे दानशूर अझीम प्रेमजींनी (Azim Premji) रशियाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) पेक्षा जास्त कमाई केली आहे

Bloomberg Billionaire index ने जगातील अब्जाधिशांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पहिल्या १० मध्ये एकही भारतीय नाही. अंबानी 89.7 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह १२ व्या नंबरवर आहेत. यंदा त्यांच्या संपत्तीत १३ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

अदानी हे 75.3 अब्जांच्या संपत्तीसह जगातील अब्जाधिशांच्या यादीत 14 व्या स्थानी आहेत. तर आशियातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या नंबरवर आहेत. चीनच्या झोंग शैनशैन यांनी त्यांना मागे टाकून ते आशियातील दुसरे श्रीमंत बनले आहेत.

अदानीची एकूण संपत्ती या वर्षात 41.5 अब्ज डॉलरने वाढली आहे. त्यांच्या अनेक सूचीबद्ध कंपन्यांनी यावर्षी ठोस परतावा दिला आहे. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे समभाग यावर्षी 254 टक्क्यांनी वधारले. त्याचप्रमाणे, अदानी ट्रान्समिशनचा हिस्सा 288 टक्क्यांनी आणि अदानी टोटल गॅसचा हिस्सा 351.42 टक्क्यांनी वाढला आहे.

दुसरीकडे, देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने यावर्षी 18.6 टक्के परतावा दिला आहे, तर बीएसई सेन्सेक्स यावर्षी 21 टक्क्यांनी वाढला आहे. प्रेमजींच्या एकूण संपत्तीत यावर्षी 15.8 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे आणि त्यांची एकूण संपत्ती 41.2 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. DMart चे प्रवर्तक राधाकिशन दमानी यांची एकूण संपत्ती यावर्षी $9.51 अब्जने वाढून $24.4 अब्ज झाली आहे.

या वर्षी विप्रोचे शेअर्स 84 टक्क्यांनी वाढले आणि दमानीच्या अव्हेन्यू सुपरमार्ट्समध्ये 66 टक्क्यांनी वाढ झाली. HCL टेकच्या शिव नाडरची एकूण संपत्ती या वर्षी $8.40 अब्जने वाढून $32.5 अब्ज झाली आहे. आयटी कंपनीचे समभाग यंदा 39 टक्क्यांनी वधारले.

सावित्री जिंदाल आणि कुमार मंगलम बिर्ला यांच्या निव्वळ संपत्तीत यावर्षी ५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. सन फार्माच्या दिलीप सांघवींची एकूण संपत्ती $4.28 अब्ज आहे, DLF च्या केपी सिंगची एकूण संपत्ती $3.61 अब्ज आहे. अलीकडेच शेअर बाजारात सूचीबद्ध फॅशन स्टार्टअप Nykaa च्या फाल्गुनी नायर यांची संपत्ती $3 अब्जांनी वाढली आहे. सावित्री जिंदाल 13.1 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह देशातील सर्वात श्रीमंत महिला आहेत.