फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 13:25 IST2025-09-16T13:17:05+5:302025-09-16T13:25:48+5:30
SIP Investment : म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे तुम्ही दोनतीन वर्षात मोठं आर्थिक ध्येय गाठू शकता. गाडी घेणाऱ्यांसाठी तर बेस्ट आहे.

अनेकांना आपल्या स्वप्नातील कार घेण्याची इच्छा असते. पण, वाढत्या महागाई आणि किमतींमुळे अनेकदा हे स्वप्न पूर्ण करणे कठीण वाटते. मात्र, योग्य आर्थिक नियोजन आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीच्या मदतीने तुम्ही तुमची आवडती गाडी दोन ते तीन वर्षांत तुमच्या दारात उभी करू शकता. म्युच्युअल फंडमधील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
तुम्ही सर्वात आधी तुम्हाला कोणती कार घ्यायची आहे आणि त्याची किंमत किती आहे, हे ठरवा. तुमच्या एकूण बजेटनुसार, कारच्या किमतीच्या २० ते ३० टक्के रक्कम डाउन पेमेंट म्हणून बाजूला ठेवण्याचे नियोजन करा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला १० लाख रुपयांची गाडी घ्यायची असेल, तर डाउन पेमेंटसाठी तुम्हाला किमान २ ते ३ लाख रुपये जमा करावे लागतील.
एसआयपी हा तुमच्या बचतीला एक दिशा देतो. तुमच्या मासिक पगारातून ठराविक रक्कम दरमहा म्युच्युअल फंडात गुंतवल्याने तुमच्या पैशांची बचत होतेच, पण त्यावर चांगला परतावा (रिटर्न) मिळून तुमची बचत वेगाने वाढते. दोन ते तीन वर्षांच्या कालावधीसाठी तुम्ही कमी जोखमीच्या किंवा संतुलित फंडमध्ये गुंतवणूक करू शकता.
तुमच्या स्वप्नातील कारच्या डाउन पेमेंटसाठी आवश्यक असलेली रक्कम साठवण्यासाठी तुम्हाला दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल, याची गणना करा. यामुळे तुमचे उद्दिष्ट स्पष्ट होईल आणि तुम्ही नियमितपणे पैसे गुंतवून ते साध्य करू शकता.
जर तुम्ही दरमहा १०,००० रुपये एसआयपीमध्ये गुंतवले आणि त्यावर वार्षिक १२ ते १३ टक्के परतावा मिळाला, तर ३ वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक ४.८० लाख रुपये होईल, ज्याचे मूल्य सुमारे ५.३५ लाख रुपयांपर्यंत वाढू शकते. यामुळे तुम्ही डाउन पेमेंटसाठी मोठी रक्कम जमा करू शकाल आणि तुमच्यावर कर्जाचा भार कमी राहील, ज्यामुळे तुमचा मासिक हप्ता कमी होईल.
एसआयपी तुम्हाला केवळ गुंतवणूक करायला शिकवत नाही, तर आर्थिक शिस्त लावायलाही मदत करते. तुम्ही तुमचे उद्दिष्ट निश्चित करून सातत्यपूर्ण गुंतवणूक केल्यास, तुमच्या स्वप्नातील गाडी नक्कीच तुमच्या दारात असेल!
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)