बँक, आधार ते GST पर्यंत..., आजपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; तुमच्या खिशावर अन् जीवनावर थेट परिणाम होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 08:43 IST
1 / 11सर्व सामान्य नागरिक, बँकांचे ग्राहक, क्रेडिट कार्डधारक आणि सरकारी कर्मचारी, आदी मंडळींसाठी एक महत्वाची बातमी आहे. आजपासून म्हणजेच (१ नोव्हेंबर २०२५ पासून) आर्थिक आणि बँकिंग संदर्भातील अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. 2 / 11यांत, बँक खाते आणि लॉकर्ससाठी एकापेक्षा अधिक नॉमिनीची सुविधा, एसबीआय कार्डच्या (SBI Card) शुल्कांमधील बदल, पीएनबी लॉकरच्या भाड्यात कपात आणि जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची प्रक्रिया आदी महत्वाच्या नियमांचा समावेश आहे. तर जाणून घेऊयात १ नोव्होंबरपासून होणाऱ्या काही बदलांसंदर्भात...3 / 11आता बँक खात्यासाठी चार नॉमिनींची सुविधा - अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, आजपासून (१ नोव्हेंबर २०२५) बँकिंग लॉ (संशोधन) अधिनियम, 2025 चे कलम १० ते १३ लागू होणार आहेत. या नवीन नियमांनुसार आता बँक खातेधारकाला एकाऐवजी चार नॉमिनी (वारसदार) नियुक्त करता येऊ शकतील. 4 / 11महत्वाचे म्हणजे, खातेदाराला हे चारही नॉमिनी एकसाथ नियुक्त करता येऊ शकतात अथवा उत्तराधिकाराचा क्रमही निश्चित करता येऊ शकतो. यामुळे खातेधारकाच्या मृत्यूनंतर पैशांच्या दाव्यावरून होणारे वाद आणि विलंब मोठ्या प्रमाणात कमी होणे अपेक्षित आहे.5 / 11एसबीआय कार्ड शुल्क - आजपासून एसबीआयने आपल्या कार्ड शुल्क संरचनेत बदल जाहीर केले आहेत. नवी फीस संरचना काही विशेष व्यवहारांसाठी लागू असेल. प्रामुख्याने, शिक्षणासंदर्भातील पेमेंट (जसे की CRED, Cheq, MobiKwik सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सद्वारे) केल्यास १% शुल्क आकारले जाईल. तथापि, शाळा/महाविद्यालयाच्या वेबसाइटवरून थेट केलेल्या पेमेंटवर शुल्क लागणार नाही. याशिवाय, ₹१,००० पेक्षा जास्त वॉलेट लोडिंग व्यवहारांवरही १% शुल्क लागेल.6 / 11पीएनबी लॉकर - पंजाब नॅशनल बँकेने (PNB) लॉकरच्या भाड्यामध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. ही सुधारित भाडेदर नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून लागू होणे अपेक्षित आहे, यामुळे ग्राहकांना दिलासा मिळेल.7 / 11जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची प्रक्रिया - केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व पेन्शनधारकांना १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान वार्षिक जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) (हयात असल्याचे प्रमाणपत्र) जमा करणे अनिवार्य आहे.8 / 11NPS मधून UPS मध्ये स्विच होण्याची मुदत - केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) मधून एकीकृत पेन्शन योजनेत (UPS) स्विच करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे.9 / 11आधार अपडेटसाठी आत फीस लागणार नाही - युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने मुलांच्या आधार कार्डवरील बायोमेट्रिक अपडेटसाठी लागणारे ₹१२५ शुल्क माफ करण्यात आले आहे. हे एका वर्षासाठी मोफत असेल. मोठ्या माणसांसाठी, नाव, जन्मतारीख, पत्ता किंवा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी ₹७५ शुल्क आकारले जाते आणि फिंगरप्रिंट्स आणि आयरीस स्कॅन सारखे बायोमेट्रिक तपशील बदलण्यासाठी ₹१२५ शुल्क आकारले जाते.10 / 111 नोव्हेंबरपासून, सरकार काही विशेष गोष्टींसाठी स्पेशल रेटसह एक नवी GST सिस्टम सुरू करेल. आदी 5%, 12%, 18% आणि 28% असे चार स्लॅब होते. ते बदलून आता 12% आणि 28% स्लॅब वगळले जातील. मात्र, लक्झरी आणि सिन गुड्सवर 40% प्रमाणे टॅक्स लागेल. याचा उद्देश भारतातील अप्रत्यक्ष कर रचना सुलभ करणे असा आहे.11 / 111 नोव्हेंबरपासून, सरकार काही विशेष गोष्टींसाठी स्पेशल रेटसह एक नवी GST सिस्टम सुरू करेल. आदी 5%, 12%, 18% आणि 28% असे चार स्लॅब होते. ते बदलून आता 12% आणि 28% स्लॅब वगळले जातील. मात्र, लक्झरी आणि सिन गुड्सवर 40% प्रमाणे टॅक्स लागेल. याचा उद्देश भारतातील अप्रत्यक्ष कर रचना सुलभ करणे असा आहे.