या एनर्जी कंपनीवर परदेशी गुंतवणूकदार फिदा, शेअर खरेदीसाठी झुंबड; अंबानींचंही आहे थेट कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 05:21 PM2024-01-25T17:21:44+5:302024-01-25T17:31:11+5:30

कंपनीचा शेअर गेल्या सहा ट्रेडिंग दिवसांत 28% ने वधारला आहे.

ऊर्जा क्षेत्राशी संबंधित स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी लिमिटेडच्या शेअरमध्ये गुरुवारी जबरदस्त तेजी बघायला मिळाली. या शेअरला 5 टक्क्यांचे अपर सर्किट लागले असून हा शेअर 576.30 रुपयांवर पोहोचला. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे.

कंपनीचा शेअर गेल्या सहा ट्रेडिंग दिवसांत 28% ने वधारला आहे. 19 ऑक्टोबर रोजी हा शेअर 253.45 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर गेला होता.

असा आहे शेअरहोल्डिंग पॅटर्न - डिसेंबर 2023 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग डेटाच्या माहितीनंतर, कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली आहे. FII (परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार) ने गेल्या तिमाहीपासून आपली हिस्सा 8% ने वाढवली आहे. सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत या ग्रीन एनर्जी स्टॉकमध्ये FII ची हिस्सेदारी 3.38% एवढी होती.

गोल्डमॅन सॅक्स फंड - गोल्डमॅन सॅक्स इंडिया इक्विटी पोर्टफोलिओ (1.22%), ईस्ट ब्रिज कॅपिटल मास्टर फंड आय लिमिटेड (1.24%) आणि ट्रू कॅपिटल लिमिटेडनेही (1.52%) गेल्या तिमाहित कंपनीमध्ये हिस्सेदारी खरेदी केली आहे.

असे आहेत तिमाही परिणाम - कंपनीने 18 जानेवारीला म्हटले आहे की, डिसेंबर 2023 तिमाही दरम्यान हाय रेव्हेन्यू वार्षिक आधारावर 99.15 कोटी रुपयांवरून कमी होऊन 62.39 कोटींवर आला. एकूण आय 46% वाढून 610.31 कोटी रुपये झाली, जी एक वर्षापूर्वी याच काळात 417.65 कोटी रुपये होती.

कंपनीचा एकूण ऑर्डर फ्लो 2,400 कोटी रुपयांपेक्षाही अधिक झाला आहे. यामुळे ऑर्डर बुक आणि मजबूत झाली आहे. कंपनीने डिसेंबर महिन्यात क्यूआयपीच्या माध्यमाने 1,500 कोटी रुपये जमवले आहेत.

असं आहे अंबानी कनेक्शन - स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी लिमिटेड ही भारत आणि आग्नेय आशियासह 29 देशांमध्ये कार्यरत आहे. कंपनीतील प्रवर्तकांची हिस्सेदारी 52.98 टक्के एवढी आहे. प्रवर्तकांमध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेडचाही समावेश आहे. या कंपनीची 32.56 टक्के भागीदारी आहे. ही भागिदारी 7,58,77,334 शेअर्स एवढी आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)