तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 19:55 IST2025-09-18T19:46:44+5:302025-09-18T19:55:54+5:30

फक्त 'या' तीनच बँकांनी विकले ₹15,800 कोटी रुपयांचे शेअर...!

शेअर बाजारात येस बँकेचे शेअर्स सध्या सातत्याने चर्चेत आहेत. हा शएअर आज व्यवहारादरम्यान 0.7% घसरून ₹21.01 प्रति शेअरवर आला. दरम्यान, ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने गुरुवारी जारी केलेल्या आपल्या नोटमध्ये, येस बँक लिमिटेडच्या शेअर्समध्ये सुमारे 19.6% पर्यंत घसरण दिसू शकते, असे म्हटले आहे.

फर्मने बँकेच्या शेअरवर ‘अंडरवेट’ रेटिंग देताना त्याचे लक्ष्य मूल्य (टार्गेट प्राइस) ₹17 प्रति शेअर निश्चित केले आहे. मागील सत्रात हा शेअर ₹21.15 वर बंद झाला होता.

काय म्हणते कंपनी - कंपनीने यापूर्वी केलेल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले होते की, जपानच्या सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन (SMBC) ने मुंबईस्थित खासगी येस बँकेत आपली 20% हिस्सेदारीची प्रारंभिक खरेदी पूर्ण केली आहे. याशिवाय, सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनने कार्लाइलच्या सीए बास्क इन्व्हेस्टमेंटकडून अतिरिक्त 4.2% हिस्सेदारी खरेदी करण्यासाठीच्या करारावरही स्वाक्षरी केली आहे. हा सौदा पूर्ण झाल्यानंतर, SMBC ची येस बँकेतील एकूण हिस्सेदारी 24% वर पोहोचेल.

येस बँकेतील वाटा विकणाऱ्यांमध्ये देशातील तीन मोठ्या बँकाचांही समावेश आहे. यांपैकी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सर्वात मोठा विक्रेता ठरला. SBI आपली 13.18% हिस्सेदारी (जवळपास 413.44 कोटी शेअर) ₹21.50 प्रति शेअर प्रमाणे विकले. यातून एसबीआयला ₹8889 कोटी रुपये मिळाले.

या शिवाय, बंधन बँकेने 15.39 कोटी शेअर्स ₹21.50 प्रति शेअरच्या दराने विकले, यामुळे त्यांची हिस्सेदारी 0.70% वरून 0.21% वर आली आहे. तसेच, फेडरल बँकेनेही 16.62 कोटी शेअर्स ₹21.50 प्रति शेअरच्या दराने SMBC ला विकले आहेत.

एकूणच, या तीनही बँकांनी 446 कोटींपेक्षाही अधिक शेअर्सची विक्री केली आहे. ज्यांची किंमत सुमारे ₹15,800 कोटी होती. या सौद्याला RBI ने ऑगस्ट 2022 मध्ये मंजुरी दिली होती, तर CCI ने सप्टेंबर 2022 मध्ये परवानगी दिली होती. तसेच, SBI च्या मंडळाने हे ट्रांझॅक्शन मे 2025 मध्येच क्लियर केले होते.

मॉर्गन स्टॅनलीचा दावा - मॉर्गन स्टॅनलीच्या मते, नजीकच्या काळात येस बँकेच्या नफ्यात हळूहळू सुधारणा होऊ शकते. मात्र, असे असले तरीही, त्यांनी शेअरवर आपली ‘अंडरवेट’ रेटिंग कायम ठेवली असून लक्ष्य मूल्य ₹17 प्रति शेअर ठेवले आहे, जे सध्याच्या पातळीच्या तुलनेत, सुमारे 19.6% घसरण दर्शवते.

तसेच, येस बँकेवर कव्हरेज करणाऱ्या 11 विश्लेषकांपैकी 2 विश्लेषकांनी ‘होल्ड’ रेटिंग दिली आहे. 9 विश्लेषकांनी ‘सेल’ रेटिंग दिली आहे. कोणत्याही विश्लेषकाने ‘बाय’ रेटिंग दिलेली नाही.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)