EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 15:05 IST2025-08-28T14:51:09+5:302025-08-28T15:05:21+5:30

तज्ज्ञांच्या मते, इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीने Mercury Ev-Tech सारख्या कंपन्यांचे भविष्य उज्ज्वल केले आहे.

शेअर बाजारात गुरुवारी मर्क्युरी ईव्ही-टेक लिमिटेड, या इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनीचा शेअर फोकसमध्ये होता. बाजारातील घसरणीनंतरही, हा शेअर आज ५ टक्क्यांनी वाढून ५१.९५ रुपयांवर पोहोचला. याला आज अप्पर सर्किट लागले.

या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षांत जबरदस्त परतावा दिला आहे. या शेअरमध्ये सुमारे ८६००% एवढी वाढ झाली आहे. या काळात या शेअरची किंमत ५९ पैशांवरून विद्यमान किंमतीपर्यंत पोहोचली आहे.

जाणून घ्या सविस्तर - २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत मर्क्युरी ईव्ही-टेकचे मार्केट कॅप ९८०.०७ कोटी रुपये एवढे आहे. गेल्या १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत कंपनीने आर्थिक वर्ष २५-२६ च्या पहिल्या तिमाहीत २३.०७ कोटी रुपयांचा महसूल, १.६३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा आणि ₹२.६२ कोटी EBITD ची नोंद केली.

गेल्या आठवड्यात, हा शेअर १.०९% ने घसरला होता. गेल्या तिमाहीत हा शेअर १६.१७% तर गेल्या वर्षाच्या तुलनेत 31.66% ने घसरला आहे.

हा शेअर आज बीएसईवर ₹48.50 च्या इंट्राडे वर खुला झाला. तर ₹51.95 च्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत या शेअरने 8600% एवढा परतावा दिला आहे. आणि आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

काय म्हणतायत तज्ज्ञ? - तज्ज्ञांच्या मते, इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीने Mercury Ev-Tech सारख्या कंपन्यांचे भविष्य उज्ज्वल केले आहे. कंपनीने आपले प्रोडक्ट्स आणि बिझनेस स्ट्रॅटेजीच्या बळावर गुंतवणूकदारांचे मन जिंकले आहे. यामुळे या शेअरने विक्रमी परतावा दिला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)