शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PF Account वर मिळतो ७ लाखांचा विमा, कोरोनानं मृत्यू झाल्यासही मिळते आर्थिक मदत; कसं ते वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 8:59 PM

1 / 9
EPFO चे सर्व सदस्य एम्पॉइज डिपॉझिट लिंक्ड इंश्युरन्स स्कीम १९७६ (EDLI) अंतर्गत कव्हर होतात. यामाध्यमातून EPFO च्या प्रत्येक सदस्याला ७ लाखांपर्यंत विमा मिळतो.
2 / 9
EPFO ची ही योजना ५ कोटींहून अधिक सदस्यांसाठी उपलब्ध आहे. EDLI योजनेअंतर्गत नोकरदाराचा आजार, अपघात किंवा मृत्यूनंतर या योजनेचा लाभ मिळवता येतो.
3 / 9
एखाद्या सदस्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधित सदस्याच्या कुटुंबातील व्यक्तीला EDLI य़ोजनेअंतर्गत ७ लाख रुपये मिळू शकतात.
4 / 9
कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर नॉमिनीकडून क्लेम केला जाऊ शकतो. जर सदस्यानं नॉमिनेशन केलं नसेल तर कायद्यानुसार उत्तराधिकारी ठरवून क्लेम दिला जातो. अशावेळी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या साथीदार किंवा मुलांना लाभार्थी ठरवलं जातं.
5 / 9
कर्मचाऱ्याच्या मृत्यूआधी तो वर्षभर एखाद्या कंपनीत कार्यरत असणं गरजेचं आहे. क्लेमवेळी इन्श्युरन्स कंपनीला कर्मचाऱ्याचं मृत्यू प्रमाणपत्र, नॉमिनीची आणि बँकेची माहिती देणं गरजेचं असणार आहे.
6 / 9
कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर नॉमिनीला क्लेम करण्यासाठी फॉर्म-५ IF जमा करावा लागतो. या फॉर्मवर संबंधित कर्मचाऱ्याच्या कंपनीनंही सत्यमापन पडताळणी करणं गरजेचं आहे.
7 / 9
EDLI स्कीममध्ये केवळ कंपनीकडून प्रिमीअम जमा केला जातो. जो कर्मचाऱ्याच्या बेसिक सॅलरी आणि महागाई भत्त्याचा ०.५० टक्के इतका असतो. यात बेसिक सॅलरीची मर्यादा १५ हजार इतकी निर्धारित करण्यात आली आहे.
8 / 9
EDLI योजनेअंतर्गत क्लेम हा कर्मचाऱ्याच्या शेवटच्या १२ महिन्यांच्या वेतनावर आधारभूत असतो. ताज्या संशोधनानुसार इन्श्युरन्स कव्हरचा क्लेम शेवटच्या बेसिक + DA च्या ३५ पट असेल. यात १.७५ लाख रुपयांचा बोनस जोडला जाईल.
9 / 9
उदाहरणार्थ, सामान्यत: एका कर्मचाऱ्याची शेवटच्या १२ महिन्यांची बेसिक सॅलरी + DA, जी १५ हजार रुपये इतकी असेल. म्हणजेच इन्श्युरन्स क्लेम (35x15000)+ 1,75,000 रुपये= ७ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम होते.
टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीbusinessव्यवसाय