शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुमचे EPF खाते आपोआप होऊ शकते बंद, अडकून राहतील खात्यात सर्व पैसे, जाणून घ्या का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 11:28 AM

1 / 8
भविष्य निर्वाह निधीशी संबंधित बहुतांश सेवा ऑनलाइन झाल्या आहेत. त्यामुळे क्लेम करणे खूप सोपे झाले आहे. पण आजही अशी अनेक प्रकरणे आहेत. ज्यामध्ये लोकांना ईपीएफ (Employees provident fund) काढतांना मोठ्या अडचणी येतात. लोकांच्या मनात ईपीएफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीबाबत अनेक प्रश्न आहेत.
2 / 8
जसे की ते आपले पैसे कधी काढू शकतात. पैसे काढण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत. ईपीएफ खाते (EPF account) कसे ट्रान्सफर करावे, असे अनेक प्रश्न असतात. पण, तुम्हाला माहिती आहे का? तुमचे ईपीएफ खाते आपोआपही बंद केले होऊ शकते. असे झाल्यास तुमच्या ईपीएफ खात्यात पडलेले संपूर्ण पैसे अडकू शकतात. ते काढण्यासाठी तुम्हाला खूप अडचणींचा करावा लागू शकतो.
3 / 8
जर तुमची जुनी कंपनी बंद असेल आणि तुम्ही तुमचे पैसे नवीन कंपनीच्या खात्यात ट्रान्सफर केले नसेल किंवा या खात्यात 36 महिन्यांपर्यंत कोणताही व्यवहार झाला नसेल. तर 3 वर्षानंतर हे खाते आपोआप बंद होईल आणि ते ईपीएफच्या निष्क्रिय खात्यांमध्ये जोडले जाईल. एवढेच नाही तर या खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्हाला खूप अडचणींचा करावा लागू शकतो. तुम्ही बँकेच्या मदतीने KYC द्वारे पैसे काढू शकता. दरम्यान, या तुमच्या निष्क्रिय खात्यावरही व्याज जमा होत राहते.
4 / 8
ईपीएफओने काही दिवसांपूर्वी आपल्या एका परिपत्रकात म्हटले होते की, निष्क्रिय खात्यांशी संबंधित क्लेम निकाली काढताना काळजी घेणे आवश्यक आहे. फसवणूक होण्याचा धोका कमी करण्यासाठी अत्यंत काळजी घेतली पाहिजे आणि खऱ्या दावेदारांना क्लेमची रक्कम देण्यात यावी.
5 / 8
भविष्य निर्वाह निधी खाती ज्यामध्ये योगदानाची रक्कम 36 महिन्यांपेक्षा जास्त काळ जमा केली जात नाही. ईपीएफओ त्यांना निष्क्रिय खात्यांच्या श्रेणीमध्ये ठेवते. तसेच निष्क्रिय खात्यांवर देखील व्याज मिळते.
6 / 8
निष्क्रिय पीएफ खात्यांशी संबंधित दावा निकाली काढण्यासाठी कर्मचाऱ्याच्या नियोक्त्याने तो क्लेम सर्टिफाइड करणे आवश्यक आहे. तसेच ज्या कर्मचार्‍यांची कंपनी बंद झाली आहे आणि क्लेम सर्टिफाइड करण्यासाठी कोणीही नसेल. तर बँक KYC कागदपत्रांच्या आधारे असा क्लेम सर्टिफाइड करेल.
7 / 8
केवायसी कागदपत्रांमध्ये पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, रेशन कार्ड, ईएसआय ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स यांचा समावेश आहे. याशिवाय आधार कार्डासारखे सरकारकडून जारी केलेले इतर कोणतेही ओळखपत्रही यासाठी वापरले जाऊ शकते. यानंतर सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त किंवा इतर अधिकारी रकमेनुसार खात्यातून पैसे काढणे किंवा खाते ट्रान्सफर करण्याची मंजुरी देऊ शकतील.
8 / 8
जर ही रक्कम 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्तांच्या मंजुरीनंतर पैसे काढले किंवा ट्रान्सफर केले जातील. जर रक्कम 25 हजार रुपयांपेक्षा जास्त आणि 50 हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर खाते अधिकारी निधी ट्रान्सफर किंवा पैसे काढण्यास मंजुरी देऊ शकतील. जर रक्कम 25 हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर डीलिंग असिस्टंटला ती मंजूर करता येईल.
टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीEmployeeकर्मचारीMONEYपैसा