अवघ्या 15 हजारांत सुरू करा तुळशीची शेती; 3 लाखांपर्यंत होईल कमाई!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 15:46 IST2021-03-29T15:39:02+5:302021-03-29T15:46:02+5:30
earn money with basil (Tulsi) cultivation and get more profit with this business : तुळशीच्या (Tulsi) शेतीतून कोणीही भरघोस कमाई करू शकते.

नवी दिल्ली: जर तुम्ही शेतीमधून कमाई करण्याचा विचार करत आहात, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या शेतीतून लाखो रुपयांची कमाई करता येऊ शकते आणि हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांची गुंतवणूकही कमी करावी लागते.
तुळशीच्या (Tulsi) शेतीतून कोणीही भरघोस कमाई करू शकते. तुळशीच्या (Basil) शेतीतून कशी करता येईल जास्त कमाई, ते जाणून घ्या...
तुळशीची शेती करण्यासाठी अधिक गुंतवणुकीची गरज नाही. त्याशिवाय तुळशीची मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येत घरात तुळशीचं रोपटं असतंच. तसंच, याचा वापर औषधांमध्ये, पूजेसाठीही आणि इतरही गोष्टींमध्ये केला जातो.
कोरोना संकटामुळे मागणी वाढली
कोरोना काळात देशभरात लोकांचा आयुर्वेदिक आणि नॅच्युरल औषधांकडे कल वाढला आहे. त्यामुळे याची मागणीही मोठ्या प्रमाणात आहे.
सध्या तुळशीचा बाजारही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशात औषधांची रोपटी (Medicinal Plants) लावण्याचा व्यवसाय सुरू केल्यास, फायदेशीर ठरू शकतो.
सहजरित्या करू शकता हा व्यवसाय
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी भल्यामोठ्या रकमेसह, मोठ्या जागेचीही गरज लागत नाही. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगद्वारेही हा व्यवसाय सुरू करता येतो.
सरासरी 3 लाख रुपयांची कमाई
तुळशीची शेती सुरू करण्यासाठी सुरुवातीला 15000 रुपये खर्च करावे लागतील. पेरणीनंतर 3 महिन्यांनी तुळशीचं पीक सरासरी 3 लाख रुपयांना विकले जाते.
बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक आयुर्वेदिक कंपन्या डाबर, वैद्यनाथ, पतंजली अशा अनेक कंपन्या तुळशीची कॉन्ट्रॅक्टवर शेती करत आहेत.